०४ डिसेंबर २०१७

राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षणासाठी क्रीडा शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

               सन 2017-18 मध्ये क्रीडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेवतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक (प्रती जिल्हा 10) क्रीडा शिक्षकांना मास्टर ट्रेनरचे दहा दिवसीय प्रशक्षिण देण्यात येणार आहे.  या प्रशिक्षण शिबीरामध्ये भोजन, निवास, प्रशिक्षण गणवेश, प्रशिक्षण साहीत्य इत्यादी सुविधा शासनाच्यावतीने पुरविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण शिबीरामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांकडून विविध खेळांचे तांत्रिक व अत्याधुनिक प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी येथे होणार असून येथील जागतिकस्तरावरील क्रीडा सुविधांव्दारे या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना मिळणार आहे.
               सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या क्रीडा शिक्षकांची सेवा किमान 10 वर्षे शिल्लक आहे व ज्या क्रीडा शिक्षकांनी यापुर्वी मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण घेतलेले नाही अशा क्रीडा शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. ज्या क्रीडा शिक्षकांनी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभाग घेतलेला आहे, अशा क्रीडा शिक्षकांना यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

               अर्जाचा विहीत नमुना www.dsosindhudurg.blogspot.in येथे ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच शालेय क्रीडा स्पर्धा माहीती पुस्तिका सन 2017-18 मध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे.  तरी इच्छुकांनी दि.08 डिसेंबर 2017 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांचे वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांचेशी 8856093608 या क्रमांकावर संपर्क साधावा.  

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...