समाजसेवा शिबीर आयोजन
|
युवक व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांव्दारे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणे व युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती प्रबळ करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या / प्रशिक्षण / चर्चासत्रांचे आयोजनाव्दारे युवक नेतृत्वांचा विकास करणे हा योजनेचा उद्देश आहे.राज्यातील युवा विकासाच्या दृष्टीकोनातून कार्य करणा-या नोंदणीकृत संस्थांना युवक विकासाच्या निगडीत असलेल्या उपक्रमांसाठी अनुदान मंजूर करण्यात येते. उदा. युवकयुवतींचे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे, व्यवसाय मार्गशर्दन करणे, बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांना तंत्रशुध्द प्रशिक्षणाचे आयोजन करणे इत्यादी. या योजनेअंतर्गत अनुदानासाठी इच्छुक संस्था किमान एक वर्ष या क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेकडे युवक कल्याण विषयक उपक्रम राबविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत पात्र संस्थांना जास्तीत जास्त रु.२५,०००/- इतके अनुदान देण्यात येते.
|
या योजनांतर्गत अनुदान मिळण्याकरीता इच्छुक संस्थांनी संपुर्ण माहिती भरलेल्या विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावे. पात्र संस्थांना या योजनांतून अनुदान देण्यात येईल. विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे
|
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
युवक कल्याण कार्यक्रम
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा. निविदा नमुन्याची किंमत : रु. ३ , ०००/-(अक्षरी रु.ती...