२२ मार्च २०१८

जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि. 27 ते 05 एप्रिल 2018 रोजी.




    क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हास्तरीय  क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबीराचे  आयोजन दि. 27 मार्च ते 05 एप्रिल 2018  या कालावधीत दहा दिवसाचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल , सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात येणार आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण्असणे आवश्यक आहे. याच भुमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण,2012 घोषित करण्यात आले असुन, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती,खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना करुन देणे आवश्यक आहे. तालुका,जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रामध्ये होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विदयार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. या पार्श्वभुमीवर क्रीडा प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी क्रीडा प्रशिक्षकांना अटी पुर्ण करणे आवश्यक आहे.
1.       क्रीडा शिक्षकांची  किमान 10 वर्षे सेवा शिल्लक असावी.
2.       यापुर्वी मागील 3 वर्षात सदरचे प्रशिक्षण घेतलेले नसावे.
 अधिक माहितीसाठी श्री. सचिन निकम, क्रीडा अधिकारी यांच्याशी मो. क्र. 8856093608 येथे संपर्क साधावा किंवा www.dsosindhudurg.blogspot.in  येथे पहावे. जिल्हातील ज्या क्रीडा शिक्षकांना या प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी दि. 27 मार्च 2018 रोजी स.09:00 वा. आपली उपस्थिती दयावी व सोबत मुख्याध्यापकांचे परवानगी पत्र जोडावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...