१३ ऑगस्ट २०१७

दि.११/८/२०१७ रोजी सर्व तालुका क्रीडा समन्‍वयक व क्रीडा शिक्षकांच्‍या बैठकीमध्‍ये झालेल्‍या चर्चेनुसार जिल्‍हास्‍तरीय शालेय क्रीडा स्‍पर्धांच्‍या कार्यक्रमामध्‍ये बदल

      शिक्षण विभागच्‍या वतीने दि.१६ ते २३ ऑगस्‍ट २०१७ दरम्‍यान आयोजित करण्‍यात येणा-या पायाभूत व नैदानिक चाचणी परीक्षांचे आयोजनामध्‍ये बदल करण्‍यात आलेने तसेच दि.११/८/२०१७ रोजी सर्व तालुका क्रीडा समन्‍वयक व क्रीडा शिक्षकांच्‍या बैठकीमध्‍ये झालेल्‍या चर्चेनुसार सर्व तालुक्‍यांच्‍या तालुकास्‍तरीय क्रीडा स्‍पर्धांच्‍या आयोजनामध्‍ये येणा-या विविध अडचणी दूर करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय शालेय क्रीडा स्‍पर्धांच्‍या कार्यक्रमामध्‍ये बदल करण्‍यात आलेले आहेत. सदर बदलांची नोंद घेवून सर्व शैक्षणिक संस्‍थांनी आपल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या क्रीडा स्‍पर्धेतील सहभागाची कार्यवाही अत्‍यंत काळजीपूर्वक करावी. झालेल्‍या बदलाची नोंद सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, पालक यांनी घ्‍यावी असे जाहीर आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांचे वतीने करण्‍यात येत आहे.
      सुधारीत कार्यक्रम क्रीडा स्‍पर्धा कार्यक्रम सन २०१७-१८  या टॅबमध्‍ये तसेच अर्ज व माहीती या स्तंभामध्‍ये ऑनलाईन पाहता येईल. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...