१६ ऑगस्ट २०१७

शालेय स्पर्धेसाठी प्रचलित असणारी इयत्तेची अट शिथील

आधारकार्ड, जन्मदाखला ,पासपोर्ट, गतवर्षाचे प्रमाणपत्र/गुणपत्रक यापैकी किमान 2 कागदपत्रे सादर करणे बंधनकारक

           भारतीय शालेय खेळ महासंघाने शालेय स्पर्धेसाठी असणारी प्रचलित इयत्तेची अट शिथील केली आहे. सन 2017-18 पासून होणाऱ्या शालेय स्पर्धामध्ये याची अंमलबजावणी करणे बाबतचे मा.आयुक्त, क्रीडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना पाठविले आहे.
           नवीन नियमानुसार 11 वर्ष वयोगटात सहभागी होण्यासाठी संबधित खेळाडू हा इयत्ता 3 री ते 5 वी या इयत्तेमध्ये शिकणारा असावा. इयत्ता 6 वी पेक्षा खालच्या वर्गात शिकत असणारे खेळाडू 14,17,19 या वयोगटात खेळण्यास पात्र असणार  नाहीत. इयत्ता 6 वी त्यापुढील इयत्तेतील खेळाडू 14,17,19 वर्षे वयोगटात सहभागी होऊ शकतील. तथापि, सुधारीत नियमानुसार इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेल्या खेळाडूचे वय 14 वर्षेसाठी तसेच 11 मध्ये शिकत असलेल्या खेळाडूचे वय 17 वर्षे वयोगटासाठी पात्र असेल तर जन्मतारेखप्रमाणे पात्र असलेल्या   वयोगटात ते खेळाडू सहभागी होवू शकतील.
           इयत्ता 11 वीमध्ये शिकत असलेला खेळाडू 17 वर्षाखालील वयोगटात सहभागी झाला असेल तर अशा खेळाडूंनी शालेय स्पर्धेच्या विहित नमुन्यातील ओळखाबरोबरच गतवर्षाचे म्हणजेच इयत्ता 10 वी मधील प्रमाणपत्र अथ्वा गुणपत्रक जोडणे बंधनकारक आहे.
           सन 2017-18 पासून शालेस स्पर्धेत सहभागी खेळाडूंना वय पडताळणी करणेकरिता 1. आधारकार्ड, 2. पासपोर्ट 3. जन्म प्रमाणपत्र ,4. गतवर्षाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र या 4 कागदपत्रापैकी किमान 2 कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. इयत्ता 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला खेळाडू कोणत्याही शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही
           तरी सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू यांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...