०७ ऑगस्ट २०१७

शालेय क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमामध्‍ये बदल करुन सुधारीत संभाव्‍य कार्यक्रम जाहीर

                या कार्यालयाच्या वतीने सन 2017-18 मधील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान शिक्षण विभागाच्या मार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयेाजन करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमामध्ये काही बदल झालेले आहेत. त्यानुषंगाने प्रशासकीय व काही अपरिहार्य कारणास्तव शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयेाजन कार्यक्रमामध्ये बदल करण्यात येत आहे. सुधारीत संभाव्य कार्यक्रम अर्ज व  माहीती  या स्‍तंभामध्‍ये देण्‍यात आलेला आहे. झालेल्या बदलाची नोंद  जिलह्यातील सर्व शैक्षणिक संस्‍था, खेळ संघटना, क्रीडा मंडळे  इत्‍यादींनी घ्‍यावी व सुधारीत कार्यक्रमानुसार या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शालेय विद्यार्थी सहभागी होण्यासाठी सहकार्य करावे. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...