क्रीडा
व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा
पॉवरलिफ्टींग असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2016-17 मध्ये पॉवरलिफ्टींग
या खेळाच्या जिल्हा व विभागस्तरीय शालेय स्पर्धांचे आयेाजन दि.१७ व १८ नोव्हेंबर 2016 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल,
बॅडमिंटन हॉल, वेंगुर्ला (कॅम्प मैदान वेंगुर्ला) येथे करण्यात येणार आहे. विभागीय स्पर्धाचे आयोजन दि.१८ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात येईल. या
स्पर्धांचे आयोजन 19 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात करण्यात येईल. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील
शाळांनी आपले प्रवेश अर्ज मुळ प्रतीत व विहीत प्रवेश शुल्क जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयास दि.१६ नोव्हेंबर 2016 रोजी पर्यंत सादर करावयाचे आहेत. मुदतीनंतर
प्रवेश अर्ज सादर करणा-या व मुदतीत शुल्क न भरणा-या खेळाडुंना (शाळांना)
स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.
या स्पर्धेच्या
अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्याशी मो.क्र.9404010408 या
क्रमांकावर किंवा श्री राजेश घाटवळ यांच्याशी ०७२७६४०६२८१ या क्रमांकावर संपर्क
साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी केले आहे.