प्रिय युवा मित्र व
मैत्रिणींनो,
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक
सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत राज्य युवा प्रशिक्षण केंद्र, पुणे
द्वारा आयोजित प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षण शिबीर दिनांक 02 ते 11
डिसेंबर 2016 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकूल, म्हाळूंगे -
बालेवाडी पुणे येथे आयोजन केलेले आहे.
शिबिरात युवकांची समाजतील भूमिका त्यांचे हक्क व कर्तव्य, जेंण्डर
सेंसिटीव्हीटी, मनशास्त्र, युवकांसाठी जीवन कौशल्य शिक्षण, मुक्तांगण सारख्या
सामजिक संस्थांना भेटी इत्यादी विषयी
मार्गदर्शन केले जाणार आहे.
युवा हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून समाजाच्या
व देशाच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढणे व युवांचे सक्षमीकरण
होणे ही काळाची गरज आहे युवांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण, कौशल्य विकास , श्रम शक्तिचे नियोजन, सामाजिक जाणीवांचे भान असणे आवश्यक आहे. आजच्या जागतिकिकरनाच्या व स्पर्धेच्या युगात
नविन आव्हानाना सामोरे जाण्यासाठी युवकांच्या सक्षमीकरणची गरज लक्षात घेऊन
महाराष्ट्र शासन युवकांचे स्वतंत्र युवा धोरण राबवत आहे. व्यक्तिमत्व विकास , प्रशिक्षण व कौशल्य विकास , स्वयंरोजगार ,राष्ट्रीय एकात्मता, संरक्षण , संविधान प्रति आदर तसेच युवांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव करुन भावी पिढीसमोर
आदर्श युवक व युवा नेतृत्व निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा
संचलनालयाच्या अंतर्गत राज्यस्तरीय जिल्हानिहाय
प्रतेकी १० युवक व युवतीसाठी १० दिवसाचे निवासी " जीवन कौशल्य शिक्षण
प्रमाणपत्र अभ्यासक्रम " व युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर शिबिरात व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व स्वयंरोजगार
नेहरू युवा केंद्राच्या योजना विविध शासकीय खात्यांचा युवक विकासाच्या योजना, करियर गायडन्स, स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन, स्पोकन इंग्लिश, क्रियेटीव
व क्रिटीकल थिंकींग समस्या निवारण इत्यादी विषयावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात
येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या युवकांना शासनाच्यावतीने विनामूल्य सहभागी
करण्यात येवून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून शिबिरार्थीची बालेवाड़ी क्रीडानगरी
येथे भोजन व निवास व्यावस्था हि विना मुल्य करण्यात येणार आहे. इयत्ता १२
वी पास असलेल्या १८ ते ३० वयोगटातील निवडक व प्रथम नोंदणी करणाऱ्या युवक व
युवतींना सदरच्या शिबिरासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र युवक व
युवतींनी प्रशिक्षण शिबिराविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोदणी प्रवेशघेण्यासाठी व
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना भेटावे. इच्छुक युवक युवतींनी अधिक
माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्याशी मो.क्र. ९४०४०१०४०८ क्रमांकावर संपर्क साधावा