०७ नोव्हेंबर २०१६

शासनाच्या राज्य युवा प्रशिक्षण केंद्रांतर्गत १० दिवसांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन


        
            शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.युकयो-2012/प्र.क्र.63/क्रीयुसे-3दि.12 नोव्‍हेंबर 2013 अन्‍वये युवा प्रशिक्षण केंद्राची स्‍थापना करण्‍यात आली आहे. राज्य युवा प्रशिक्षण केंद्राच्‍या अंतर्गत १० दिवसांच्‍या प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे  आयोजन दि.२१  ते ३० नोव्हेंबर २०१६  या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलम्‍हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे करण्‍यात येणार आहे.
         १० दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये १८ ते ३५ या वयोगटातील युवकांना विविध जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेया प्रशिक्षणामध्ये नेहरु युवा केंद्राकडे नेहरु युवा कर्मी (NYC), राष्‍ट्रीय सेवा योजनेचे शिबीर पुर्ण केलेले विद्यार्थी युवक युवती राष्‍ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी युवक व युवतीएम.एस.डब्‍ल्‍यु. एम.ए. सायकॉलॉजी, एम.ए सोशियॉलॉजीइ. शिक्षण घेत असलेले युवक युवतीस्‍वयंसेवी संस्‍थानोंदणीकृत युवा व महिला मंडळेइ. कडून सामाजिक कार्यात रस घेणारे व आवड असणारे युवक युवती यांना प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. 

         या प्रशिक्षण शिबीराकरीता भोजननिवास व प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासनाच्‍यावतीने करण्‍यात येणार आहे. राज्यस्तरीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षण असल्याने यामध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातील युवक-युवती सहभागी होणार आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक - युवतींनी यासाठी नाव नोंदवावी असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. इच्‍छुक युवक युवतींनी अधिक माहीतीसाठी जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा श्री सचिन निकम  क्रीडा अधिकारी यांच्‍याशी मो.क्र. ९४०४०१०४०८ क्रमांकावर संपर्क साधावा अथवा www.dsosindhudurg.blogspot.in येथे पहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी केले आहे. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...