महाराष्ट्र
शासनाने राज्याचे युवा धेारण 2012 जाहीर
केले आहे. राज्यातील
युवांनी, युवक कल्याण विषयक कार्य करणा-या युवा व सामाजिक संस्थानी केलेल्या
समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन
मिळावे यासाठी युवा पुरस्कार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र
शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सन २०१४-१५ व २०१५-१६ चे राज्य
युवा पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील युवक, युवती व पात्र संस्थांनी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर
करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य युवा पुरस्काराचे स्वरुप -
1) युवांसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख पुरस्कार
रु.50,000/- व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख पुरस्कार
रु.1,00,000/- असे आहे.
युवक / युवतींसाठी पात्रता निकष -
Ø अर्जदार युवक युवतीचे वय पुरस्कार
वर्षाती 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे.
Ø राज्यात सलग 10 वर्षे वास्तव्य
असणे आवश्यक
Ø अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार
प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र
देणे आवश्यक राहील.
संस्थांसाठी पात्रता निकष -
Ø अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त
झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे
आवश्यक राहील.
Ø अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त
अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबध्द असावी.
Ø अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर
किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.
Ø अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा
पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन)
देणे आवश्यक राहील.
कार्ये -
Ø युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या
संस्थांनी केलेले कर्य दि.1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षांची
केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल.
Ø युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी
ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य.
Ø राज्याचे साधन संपत्ती जतन व
संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य
Ø समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती,
जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य
Ø शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य,
पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय,
महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण
विकासासाठी केलेले कार्य.
Ø राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन
देणारे कार्य.
Ø नागरी गलिच्छवस्ती सुधारणा,
झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, साहस इ.
बाबत कार्य, कार्य .
राज्य युवा पुरस्कारांसाठी दि.13 मे 2016 पर्यंत सादर करण्यात यावे. अर्ज नमुने जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उपलब्ध
असून www.sports.maharashtra.gov.in
आणि www.dsosindhudurg.blogspot.in
येथेही ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी
यांच्याशी ८८५६०९३६०८ या क्रमांकावर
संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.