२६ फेब्रुवारी २०१६

जिल्हास्‍तर युवा पुरस्कांरासाठी दि.21 मार्च 2016 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन



      जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा युवा पुरस्‍कारांचे वितरण करण्‍यात येणार आहे. राज्‍याचे युवा धोरण -2012 मधील शिफारशीच्‍या अनुषंगाने शासनाने राज्‍य व जिल्‍हास्‍तरावर युवा पुरस्‍कार देण्‍याचा निर्णय घेतलेला आहे.
             युवा अथवा नोंदणीकृत संस्‍थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्‍यादी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्‍य, पर्यावरण, सांस्‍कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्‍यवसाय, महिला सक्षमीकरण, स्‍त्रीभ्रुण, व्‍यवनमुक्‍ती तसेच युवांच्‍या सर्वांगीन विकासासाठी केलेले कार्य, राष्‍ट्रीय एकात्‍मतेस प्रोत्‍साहन देणारे कार्य, नागरी गलिच्‍छ वस्‍ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन तसेच स्‍थानिक समस्‍या, महिला सक्षमीकरण, साहस इ.बाबत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी या पुरस्‍कारांसाठी विचारात घेतली जाईल. केलेल्‍या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्‍यक राहील. उदा. वृत्‍तपत्र कात्रणे, प्रशस्‍तीपत्रे, चित्रफीती व फोटो इत्‍यादी. 
            जिल्‍हास्‍तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्‍था यांना पुरस्‍कार देण्‍यात येईल. सदरचा पुरस्‍कार गौरवपत्र, सन्‍मानचिन्‍ह, रोख रक्‍कम रु10,000/- (प्रति युवक व युवतीसाठी), एका संस्‍थेसाठी गौरवपत्र, सन्‍मानचिन्‍ह, रोख रक्‍कम रु.50,000/- अशा स्‍वरुपाचा असेल.
            सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील युवा अथवा पात्र नोंदणीकृत संस्‍थांनी आपले अर्ज विहीत नमुन्‍यात भरुन योग्‍य कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्‍ताव जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दि.21 मार्च 2016 पर्यंत सादर करावा. विहीत मुदतीनंतर आलेल्‍या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्‍यावी. 
            विहीत नमुन्‍यातील अर्ज या ब्‍लॉगवरी विविध अर्ज नमुने येथील लिंकवर उपलबध आहेत. अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्‍याशी ८८५६०९३६०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...