जिल्हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्गनगरी
येथील जलतरण तलाव (25 मी. X21 मी.) कंत्राट पद्धतीने चालवण्यासाठी मोहरबंद
निविदा मागविण्यात येत आहेत. निविदेच्या अटि व शर्ती निविदेच्या नमुन्यात दिलेल्या
आहेत. निविदेचे विहित अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ए
ब्लॉक, तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी
येथे रु.1000/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) रोख भरुन शासकीय
सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाजाचे वेळेत दि.10/05/2016 ते दि.
18/05/2016 या कालावधीत निविदा फॉर्म विक्री करण्यात येतील. संपूर्ण
भरलेला निविदा फॉर्म दि.19/05/2016 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. भरलेले निविदा फॉर्म शक्य असल्यास दि. 19/05/2016
रोजी दुपारी 4.00 वा. उघडण्यात येतील. सर्व निविदा कोणतेही कारण न देता फेटाळण्याचा अधिकार समितीने
राखून ठेवला आहे.
दिनांक- ०७/५/२०१६
ठिकाण - सिंधुदुर्गनगरी
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष
जिल्हा क्रीडा संकुल समिती,
सिंधुदुर्ग