०२ जानेवारी २०१६

जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

        प्रतिवर्षी राज्य शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्यातील व जिल्ह्यातील  गुणवंत क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, व क्रीडा कार्यकर्ते यांच्या कार्याचे व योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हवा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. 
            गेल्या दहा वर्षात सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल स्कुल गेम्स, वरीष्ठ राष्टीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेला खेळाडु इत्यादींना मार्गदर्शन केलेले तसेच राज्य व राष्ट्रीयस्तरावर पदक विजेते खेळाडु तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा मार्गदर्शक या पुरस्कारासाठी अर्ज सादर करु शकतात तर गुणवंत खेळाडु पुरस्काराकरीता मागील पाच वर्षांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळाडुंना अर्ज सादर करता येतील.  
                या पुरस्कारासाठी पात्र व इच्छुकांनी विहीत नमुन्यातील आपले अर्ज संपुर्ण तपशीलवार माहितीसह भरुन आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि.11 जानेवारी 2016 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा नमुना "विविध अर्ज नमुने" या विभागात दिलेले आहेत. इच्छुकांनी विहीत कालावधीत अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. 
                  

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...