केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने
प्रतिवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये
देशातील विविध राज्यातून आलेल्या संघामध्ये सहभागी युवक युवती आपल्या कलांचे सादरीकरण
करत असतात. याचधर्तीवर राज्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता तसेच युवकांच्या सुप्त
गुणांना वाव देण्यासाठी तसेच राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी
शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा
संचालनालयाकडून जिल्हा, विभाग व राज्य
पातळीवर युवा महोत्साचे आयेाजन करण्यात येते. राज्यपातळीवर उत्कृष्ट सादरीकरण
करणा-या युवक युवतींना राज्यातर्फे राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची
संधी प्राप्त होते. कला क्षेत्रामध्ये उच्चतम कामगिरी करणा-या युवक युवतींना व
कला क्षेत्रातील व्यक्तिंना शासनाकडून विविध प्रकारे सुविधा व सवलती देण्यात
येतात.
युवा महोत्सवाच्या
आयेाजनाची सुरुवात जिल्हा पातळीवरुन होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या
वतीने सन २०१५-१६ मध्ये दि.१८/१२/२०१५ रोजी डिपीडीसी हॉल (जुना) येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येणार
आहे. या युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (इंग्रजी / हिंदी),
शास्त्रीय गायन (हिन्दुस्थानी), शास्त्रीय
नृत्य, सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, होर्मोनियम, गिटार, मणिपुरी
नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम,
कथ्थक, कुचिपुडी नृत्य, वक्तृत्व या बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये
सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील १३ ते ३५ वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता
येईल.
युवा महोत्सवासाठी प्रवेश फॉर्म, प्रकार व नियमावली विविध अर्ज नमुने या सेक्शन मध्ये उपलब्ध करुन देण्यत आलेले आहेत. या युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.