राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून
राज्याचे क्रीडा धोरण २०१२ घोषित करण्यात आलेले आहे. या क्रीडा धोरणातील मुद्दा क.
६ (५) नुसार खेळामधिल बदलेले अधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या
पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त
माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा,
विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी
क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना
योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यायावत प्रशिक्षण असणे आवश्यक
आहे. यासाठी अद्यावत क्रीडा धोरण सन २०१२ तयार करण्यात येऊन त्याच्या अंमलबजावणी साठी
दि. 28/०4/२०१4 चा
शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
सन २०१८-१९ ते २०२१-२२ या वर्षात काही तांत्रिक अडचणी व कोविड १९ प्रादुर्भाव
यामुळे क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिविर कार्यक्रम झालेले नाहीत. सन २०२२-२३ या वर्षात
राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून त्याकरिता जिल्ह्यातील
अनुदानित, विनाअनुदानित उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शाळा, आश्रमशाळांमधील क्रीडा विषयक
अर्हता धारण करणा-या व किमान 10 वर्षे सेवा
शिल्लक असलेल्या शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छूकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह विहीत नमुन्यातील अर्ज या
कार्यालयाकडे दि. 20 ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत. सदर अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ब्लॉग dsosindhudurg.blogspot.in या ब्लॉगवर तसेच कार्यालयात उपलब्ध आहे.