संयुक्त राष्ट्रसंघाने
“21 जून” हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केलेला आहे.
5000 वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या
ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या
शारिरीक आणि
आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. पाचव्या जागतिक
योगा दिनाचे आयोजन दि. 21
जून 2019 रोजी सर्वत्र करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रशासन,
शिक्षण विभाग, आयुष विभाग, स्काऊट गाईडस व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर तसेच
तालुकानिहाय विविध ठिकाणी योगदिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात
आले आहे. जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे दि.
21 जून, 2019 रोजी स. 7.30 ते 8.30 या वेळेत होणार असून सदर कार्यक्रमात डॉ. सुविनय
दामले हे योगाभ्यासाचे प्रशिक्षण देणार आहेत.
तालुकानिहाय योग प्रशिक्षणाचे आयोजन दोडामार्ग
हायस्कुल ता. दोडामार्ग, साई मंगल कार्यालय व तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ला, कुडाळ
हायस्कुल, कुडाळ टोपीवाला हायस्कुल मालवण, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली श्री
माधवराव पवार विद्यालय, कोकीसरे वैभववाडी शेठ म.ग. हायस्कुल देवगड याप्रमाणे करण्यात
आले आहे.
जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी आपापल्या
शाळा. महाविद्यालयांमध्ये व्यापक प्रमाणात योगदिनाचे आयोजन करुन सर्व विद्यार्थ्यांना
योग प्रशिक्षणामध्ये सहभागी करुन घ्यावे व योगदिन साजरा करुन केलेल्या कार्यवाहीचा
अहवाल विहीत नमुन्यात शिक्षण व क्रीडा विभागाकडे सादर करावा असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी श्री. किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
Common Yoga Protocol साठी येथे क्लिक करावे.
Common Yoga Protocol साठी येथे क्लिक करावे.