जिल्हास्तर युवा महेात्सवाचे
आयोजन दि.४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गनगरीत
केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण
विभागाच्या वतीने प्रतिवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन
करण्यात येते. यामध्ये देशातील विविध राज्यातून आलेल्या संघामध्ये सहभागी
युवक युवती आपल्या कलांचे सादरीकरण करत असतात.
याच
धर्तीवर राज्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव
देण्यासाठी तसेच राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी शासनाच्या वतीने
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरयुवा महोत्साचे आयेाजन करण्यात येते. राज्यपातळीवर
उत्कृष्ट सादरीकरण करणा-या युवक युवतींना राज्यातर्फे राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये
सहभागी होण्याची संधी प्राप्त होते. कला क्षेत्रामध्ये उच्चतम कामगिरी करणा-या
युवक युवतींना व कला क्षेत्रातील व्यक्तिंना शासनाकडून विविध प्रकारे सुविधा व
सवलती देण्यात येतात.
युवा महोत्सवाच्या आयेाजनाची सुरुवात जिल्हा पातळीवरुन होते. जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०१८-१९ मध्ये दि.०४/१२/२०१८ रोजी जिल्हा नियेाजन समिती सभागृह (नविन) , सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येणार आहे. या
युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका(इंग्रजी/हिंदी), शास्त्रीयगायन(हिन्दुस्थानी), सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, होर्मोनियम, गिटार, मणिपुरीनृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी नृत्य, वक्तृत्व (इंग्रजी/हिंदी) या बाबींचा समावेश
आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील १५ ते
२९ वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल.युवा महोत्सवामध्ये सहभागी
होण्यासाठी इच्छुकांनी आपली स्पर्धापुर्व नाव नोंदणी दि.०१ डिसेंबर २०१८ पर्यंत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत वा अन्य अधिक
माहीतीसाठी क्रीडा अधिकारी श्रीमती रोहिणी मोकाशी यांच्याशी ०२३६२-२२८२७0 या क्रमांकावर संपर्क साधावा किवा www.dsosindhudurg.blogspot.in येथे पहावे. जिल्ह्यातील
जास्तीत जास्त युवक – युवती / संघांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
-----------[[[-----------
जिल्हास्तर युवा महोत्सव
आयेाजन नियमावली
· 1. सहभागी युवक /युवती १५ ते
२९ वयोगटातील असावा.
· 2.ज्या बाबींना साथसंगत
आवश्यक आहे, त्या कलाकरांना वयेामर्यादा
लागु नाही.
· 3.एकांकीकेमध्ये सहभागी होणारे सर्व युवा कलाकार तसेच एकांकिका लेखक, निर्माता, दिग्दर्शक सुध्दा
१५ ते २९ वयोगटातील असावेत.
· 4.सहभागी होणारे युवक / युवती
सिंधुदुर्गजिल्ह्यातील रहीवाशी असणे आवश्यक
· 5.शास्त्रीय नृत्य सादर
करणा-या कलाकारांना पुर्वमुद्रीत ध्वनीफितीवर (कॅसेट , सी डी) कार्यक्रम सादर करता येईल.
· 6. लोकगीत व लोकनृत्य या प्रकारातील
गीते शक्यतो चित्रपट बाह्य असावीत.
· 7. सहभागी कलाकारांनी आवश्यक
असणारे साहीत्य स्व:तच्या जबाबदारीवर आणावे.
अ.क्र.
|
बाब
|
सहभाग
संख्या
|
वेळ
|
अ.क्र.
|
बाब
|
सहभाग
संख्या
|
वेळ
|
1
|
लोकनृत्य
|
20
|
15
मिनिट
|
10
|
मृदंग
|
1
|
10
मिनिट
|
2
|
लोकगीत
|
6
|
7
मिनिट
|
11
|
हार्मोनियम
|
1
|
10
मिनिट
|
3
|
एकांकिक
(इंग्रजी/हिंदी)
|
12
|
45
मिनिट
|
12
|
गिटार
|
1
|
10
मिनिट
|
4
|
शास्त्रीय
गायन (हिन्दुस्थानी
|
1
|
15
मिनिट
|
13
|
मणिपुरी
नृत्य
|
1
|
15
मिनिट
|
5
|
शास्त्रीय
नृत्य
|
1
|
15
मिनिट
|
14
|
ओडीसी
नृत्य
|
1
|
15
मिनिट
|
6
|
सितार
|
1
|
15
मिनिट
|
15
|
भरतनाट्यम
|
1
|
15
मिनिट
|
7
|
बासरी
|
1
|
15
मिनिट
|
16
|
कथ्थक
|
1
|
15
मिनिट
|
8
|
तबला
|
1
|
10
मिनिट
|
17
|
कुचिपुडी
नृत्य
|
1
|
15
मिनिट
|
9
|
वीणा
|
1
|
15
मिनिट
|
18
|
वक्तृत्व
(हिंदी /इंग्रजी)
|
1
|
4
मिनिट
|