राष्ट्रीयस्तरावर
आंतरशालेय बॅंड स्पर्धा आयेाजित करण्याचे केंद्र शासनाच्या वतीने निश्चीत करण्यात
आले आहे. सन २०१७-१८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर आंतर शालेय बॅंड स्पर्धांचे
आयेाजन करण्यात येणार आहे. तत्पुर्वी
क्षेत्रीय स्तर (आंतरराज्य झोनल
) व राज्यस्तरावर या स्पर्धा आयेाजित
करण्याचे आदेश केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिलेले आहेत.
पश्चिम क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा ,राजस्थान, दिव व दमन, दादरा व नगर हवेली या सहा राज्यांचा समावेश
असून महाराष्ट्र राज्य यासाठी लणुन
काम पाहणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यस्तरीय आंतर
शालेय बॅंड स्पर्धांचे आयेाजन विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे दि.१८ ते १९ नोव्हेबर २०१७ या
कालावधीत करण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्ययातून उत्कृष्ट एक मुलांचा संघ व एक मुलींचा संघ सहभागी होणार
आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हास्तरीय निवड
चाचणीचे आयेाजन दि.१५/११/२०१७ रोजी सकाळी १०.०० वा. जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी
ता. कुडाळ येथे करण्यात येईल. या स्पर्धेची नियमावली पुढील प्रमाणे
राहील - १) मुला , मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयेाजन करण्यात
येईल. 2) बॅंड पथकातील विद्यार्थ्यांची संख्या ( मुले २० + मुली २० + १ पुरुष संघव्यवस्थापक +
१ स्त्री संघव्यवस्थापक) सर्व मिळुन ४२ पेक्षा जास्त नसावी. 3) सादरीकरणासाठी
जास्तीत जास्त ३ ते ५ मिनीटाचाकालावधी राहील. 4) बॅंडपथकाच्या सादरीकरणासाठी PIPE & DRUM BAND यांचा समावेश असावा. ५) बॅंडपथकाचे
सादरीकरण हे देशभक्तीपर असावे. 6) चित्रपट गीतांच्या व राष्ट्रगीताच्या धुनवर
सादरीकरण नसावे. 7) बॅंड पथकाचा गणवेश
असल्यास प्राधान्य देण्यात
येइ्ल. 7) खर्चाच्या सर्व बाबी संबंधित शाळा / संस्थेने करावयाचे आहेत. 8) परीक्षकांनी दिलेला स्पर्धेचा निर्णय
अंतिम राहील.
याबाबत अधिक माहीती साठी श्री
सचिन निकम क्रीडा अधिकारी यांचेशी ८८५६०९३६०८ या क्रमांकावर संपर्कसाधावा किंवा sindhusports@yahoo.com येथे लिहावे असे आवाहन श्री किरण बोरवडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी
यांचेवतीने करण्यात येत आहे.