२१ सप्टेंबर २०१७

जिल्‍हास्‍तरीय शालेय मैदानी, खो-खो व क्रिकेट स्‍पर्धा सन २०१७-१८ नियोजीत स्‍पर्धा कार्यक्रमामध्‍ये पावसाळी हवामानामुळे बदल

स्‍पर्धा  परिपत्रक -
                        क्रीडा  व  युवक  सेवा  संचालनालय,  महाराष्‍ट्र  राज्‍य  अंतर्गत या कार्यालयाच्‍या वतीने  जिल्‍हास्‍तरीय  शालेय  जिल्हास्तरीय शालेय  खो- खो स्पर्धाचे दि.21 व 22 सप्टेंबर 2017, मैदानी स्‍पर्धांचे आयेाजन दि.23 व २5 सप्‍टेंबर २०१७,  या कालावधीत जिल्‍हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे तसेच जिल्हास्तरीय शालेय  क्रिकेट स्पर्धा टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे नियोजित होते. परंतु दि.१७ सप्‍टेंबर २०१७ पासून ढगाळ हवामान व जिल्हाभरामध्ये सतत पाऊस पडत असल्‍याने मैदानांवर पाणी साचले आहे.
                        जिल्‍हा  क्रीडा अधिकारी यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानांची प्रत्‍यक्ष पाहणी करुन मैदानी,  खो-खो व क्रिकेट या खेळांच्या नियोजीत स्‍पर्धांचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कार्यालयाचे दि.18/09/2017 रोजीचे परिपत्रक रद्द समजण्यात यावे.  
                        मैदानी, खो-खो व क्रिकेट या खेळांच्या स्पर्धांचे सुधारीत नियोजनाचे परिपत्रक मैदाने खेळण्यासाठी अनुकुल होताच  प्रसिध्द करण्यात येईल. झालेल्‍या  बदलाची  नोंद सहभागी  होणारे सर्व  खेळाडू, क्रीडा शिक्षक,  शैक्षणिक संस्‍था, पालक यांनी घ्‍यावी.  तसेच या स्पर्धांच्या सुधारीत कार्यक्रमाच्या माहितीसाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.    

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...