स्पर्धा परिपत्रक -
क्रीडा व
युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र
राज्य अंतर्गत या कार्यालयाच्या
वतीने जिल्हास्तरीय शालेय
मैदानी स्पर्धांचे आयेाजन दि.१८ ते २० सप्टेंबर २०१७ या कालावधीत जिल्हा
क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे करण्याचे नियोजित होते. परंतु दि.१७ सप्टेंबर २०१७ व १८
सप्टेंबर २०१७ रोजी ढगाळ हवामान व सतत पाऊस पडत
असल्याने दि.१८ सप्टेंबर २०१७ रोजी
मैदानावर पाणी साचले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी
करुन व उपस्थित तालुका क्रीडा समन्वयक / क्रीडा शिक्षक यांचेशी चर्चा
करुन नियोजीत स्पर्धांचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा
क्रीडा अधिकारी यांनी उपस्थित तालुका क्रीडा समन्वयक /
क्रीडा शिक्षक यांचेशी चर्चा करुन जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा दि.२३ व
२५ सप्टेंबर २०१७
या दोन दिवशी घेण्याचे सुधारीत नियोजन केले आहे. या
परिपत्रकाव्दारे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचा सुधारीत आयोजन
कार्यक्रम पुढील प्रमाणे
निश्चीत करण्यात येत आहे. दि.२३
सप्टेंबर २०१७ रोजी १४
व १९ वर्षाखालील
मुले व मुली यांच्या स्पर्धा
होतील. तर दि.२५ सप्टेंबर २०१७
रोजी १७ वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे होतील.
वरीलप्रमाणे
झालेल्या बदलाची नोंद सहभागी
होणारे सर्व खेळाडू, क्रीडा
शिक्षक, शैक्षणिक
संस्था, पालक यांनी घ्यावी. दि.१९ व २० सप्टेंबर
२०१७ रोजी नियोजीत स्पर्धा होणार नाहीत.
तसेच सुधारीत आयोजन
कार्यक्रमानुसार खेळाडू उपस्थित राहतील
याबाबत क्रीडा शिक्षक, शैक्षणिक संस्था, पालक यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेवतीने करण्यात येत
आहे.