०१ एप्रिल २०१७

"विषय - ट्रॅकसुट पुरवठा करण्याचे दरपत्रक सादर करणे"

जा.क्र.जिक्रीअ/क्रीशिप्र/जिल्‍हा/2016-17/का-4/                                                                                 दि.29/3/2017

जाहीर सुचना

                 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन 2016-17 मध्‍ये जिल्‍हास्‍तर क्रीडा शिक्षकांचे (दहा दिवसीय) प्रशिक्षण शिबीर दि.15 ते 24 एप्रिल 2017 या कालावधीत करण्याचे प्रस्तावित आहे. शिबीरातील प्रशिक्षणार्थींसाठी 79  ट्रॅकसुट पुरवठा करणे करीता दर पत्रक मागविण्‍यासाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
                      इच्छुक पुरवठादार यांनी या साहीत्‍याचे दरपत्रक दि.05/04/2017  रोजी सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ए ब्लॉक, तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे खालील नमुन्यामध्ये संस्थेच्या / पुरवठाराच्या लेटर हेडवर सीलबंद लिफाफ्यामध्‍ये सादर करावे.          
बाब
दर प्रति ट्रॅकसुट
ट्रॅकसुट (कार्यालयात उपलब्‍ध नमुन्‍याप्रमाणे)  व ट्रॅकसुटवर छातीच्‍या समोर डाव्‍या बाजुस क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा लोगो प्रिंट केलेला.

                      सीलबंद लिफाफ्यावर "विषय - ट्रॅकसुट पुरवठा करण्याचे दरपत्रक सादर करणे" असे नमुद करावे. शक्य झाल्यास प्राप्त दरपत्रक दि.06/04/2017 रोजी सकाळी 11.00 वा. उघडण्यात येतील. कोणतेही कारण न देता दरपत्रके स्वीकारणे अथवा नाकरणेचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीतांनी  राखून ठेवले आहेत.             
                      दर सादर करतांना या कार्यालयात उपलब्‍ध असलेला ट्रॅकसुटचा नमुना पाहुन त्‍याच दर्जाचे ट्रॅकसुट पुरवठा करण्‍यासाठी दर सादर करावे. ट्रॅकसुटचा नमुना या कार्यालयात पाहण्‍यासाठी उपलब्‍ध आहे.
अटी व शर्ती -
1.       प्रती एक नगाचे दर सर्व करांसहीत सादर करावे. सादर दराव्यतिरिक्त इतर कोणतेही कर, अधिभार, वाहतूक खर्च, चढ - उतार मजूरी इ. कोणतेही शुल्क अदा केले जाणार नाही.
2.       यशस्वी पुरवठादार यांनी त्यांचे / संस्थेचे पॅनकार्ड ची छायाप्रत या कार्यालयास जमा करावी लागेल.   
3.       ट्रॅकसुटचा दर्जा कार्यालयाच्‍या नमुन्‍या प्रमाणेच असावा. 
4.       सर्व ट्रॅकसुटचा पुरवठा सिंधुदुर्गनगरी येथे करावा लागेल त्‍यासाठी कोणताही जादाचा खर्च अदा केला जाणार नाही.
5.       अनुदान उप‍ब्‍धतेनुसार देयक अदा करण्‍यात येईल.
6.       काम पुर्ण झाल्यानंतर पुरवठादारास अदा करावयाच्या देय रकमेवर शासन नियमानुसार आवश्यक असल्यास उद्गम कर (T.D.S.) कपात करण्यात येईल.
7.       दर स्‍वीकारणे अथवा नाकारण्‍याचे अधिकार जिल्‍हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांना राहतील.



जिल्‍हा क्रीडा अधिकारी

सिंधुदुर्ग 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...