जा.क्र.जिक्रीअ/क्रीशिप्र/जिल्हा/2016-17/का-4/ दि.29/3/2017
जाहीर सुचना
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग
यांच्या वतीने सन 2016-17 मध्ये जिल्हास्तर क्रीडा
शिक्षकांचे (दहा दिवसीय) प्रशिक्षण शिबीर दि.15 ते 24 एप्रिल 2017 या
कालावधीत करण्याचे प्रस्तावित आहे. शिबीरातील प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था
करणे करीता दर पत्रक मागविण्यासाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
इच्छुक पुरवठादार यांनी आपल्या
लेटरहेडवर साहीत्याचे दरपत्रक दि.05/04/2017 रोजी सायंकाळी 06.00 वा.पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ए ब्लॉक,
तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे सीलबंद लिफाफ्यामध्ये सादर करावे.
सीलबंद
लिफाफ्यावर "विषय - निवासव्यस्था
दरपत्रक सादर करणे" असे नमुद करावे. शक्य झाल्यास प्राप्त दरपत्रके
दि.06/04/2017
रोजी
सकाळी 11.00
वा. उघडण्यात येतील. कोणतेही कारण न देता दरपत्रके स्वीकारणे अथवा नाकारण्याचे
सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीतांनी राखून ठेवले आहेत.
निवास व्यवस्थेकरीता
भाड्याने घ्यावयाचे साहीत्य
अ.क्र.
|
साहीत्य
|
संख्या
|
प्रती सेट प्रति दिवस दर
|
1
|
गादी, बेडशीट, उशी व चादर सेट
|
110 सेट
|
|
अटी व शर्ती
1.
भाड्याचे दर हे सर्व करांसहीत सादर करावे. सादर
दराव्यतिरिक्त इतर कोणतेही कर, अधिभार, वाहतूक खर्च, चढ - उतार मजूरी इ. कोणतेही
शुल्क अदा केले जाणार नाही.
2.
यशस्वी पुरवठादार यांनी त्यांचे / संस्थेचे पॅनकार्ड ची
छायाप्रत या कार्यालयास जमा करावी लागेल.
3.
वरील प्रमाणे 110 सेट पुरवठा करण्याची मागणी आहे. त्यानुसार
पहिले दोन दिवसांचे 110 सेटचे भाडे अदा करण्यात येईल. तथापि शिबीरासाठी उपस्थित
राहणारे प्रशिक्षणार्थींची निश्चीत संख्या स्पष्ट होईल त्यानंतर आवश्यक संख्येनुसारच उर्वरीत आठ दिवसांचे भाडे
अदा करण्यात येईल. तथापि ही संख्या 50 पेक्षा कमी असल्यास कमीत कमी 50 सेटचे उर्वरीत
दिवसांचे भाडे अदा करण्यात येईल. (उदा. दोन दिवसानंतर आवश्यक संख्या जर 70 असेल तर 70
सेटचे आठ दिवसांचे भाडे किंवा ही संख्या जर 50 पेक्षा कमी म्हणजे 40 असेल तर
किमान 50 सेटचे आठ दिवसांचे भाडे)
4.
स्वच्छ साहीत्याचाच पुरवठा करण्यात यावा.
5.
वरील साहीत्याचा पुरवठा सिंधुदुर्गनगरी येथे करावा लागेल
त्यासाठी कोणताही जादाचा खर्च अदा केला जाणार नाही.
6.
बेडशीट, उशीची अभ्रे व चादर एकवेळ (साधारण पाचव्या दिवशी) बदलण्यात
यावे.
7.
अनुदान उपब्धतेनुसार देयक अदा करण्यात येईल.
8.
काम पुर्ण झाल्यानंतर पुरवठादारास अदा करावयाच्या देय
रकमेवर शासन नियमानुसार आवश्यक असल्यास उद्गम कर (T.D.S.) कपात करण्यात येईल.
9.
दर स्वीकारणे अथवा नाकारण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा
अधिकारी सिंधुदुर्ग यांना राहतील.
जिल्हा क्रीडा अधिकारी
सिंधुदुर्ग