क्रीडा
व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2016-17 मध्ये आयोजित
करावयाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये 39 विविध
खेळांचा समावेश करण्यात आलेला होता व या 39 खेळांच्या तालुका/जिल्हास्तरीय
स्पर्धांचे आयोजन कार्यलयाच्या वतीने करण्यात येत आहे.
क्रीडा
व युवक सेवा संचालनालयाच्या सुचनेनुसार उर्वरीत 25 क्रीडा प्रकारांचे आयोजन शालेय
क्रीडा स्पर्धंमध्ये करण्यात येणार असून आयोजन करावयाचे खेळ पुढील प्रमाणे आहेत - 1.
थ्रोबॉल, 2.सिकई मार्शल आर्ट, 3.डॉजबॉल, 4. रोलबॉल, 5.कुडो, 6.पॉवरलिफ्टींग, 7.रोप
स्किपींग, 8.फुटबॉल टेनिस, 9. स्पीडबॉल, 10.फ्लोअरबॉल, 11. रग्बी, 12.टेनिक्वॉईट,
13.वुडबॉल, 14.टग ऑफ वॉर, 15.थांग ता मार्शल आर्ट, 16.अष्टे डु आखाडा, 17. कुराश,
18.टेंग सु डो, 19.चॉकबॉल, 20.जित कुने दो, 21.फिल्ड आर्चरी, 22. सुपर सेवन
क्रिकेट, 23.कॉर्फबॉल, 24.मिनिगोल्फ, 25.थायबॉक्सिंग
वरील
खेळांपैकी थ्रोबॉल वगळता इतर सर्व खेळ हे विनाअनुदानित खेळ प्रकार असल्याने जिल्हा,
विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा अयेाजनाची आर्थिक व तांत्रिक बाबींची
जबाबदारी संबंधित संघटनेची राहील. या स्पर्धांच्या आयोजनाचे वेळापत्रक तयार करणे
आवश्यक असून काही खेळांच्या विभागीय स्पर्धांसाठी अत्यंत कमी कालवधी असल्याने वरील
खेळांच्या जिल्ह्यातील एकविध जिल्हा खेळ संघटना यांनी तात्काळ संघटना अधिकृत असल्याबाबतची
सादर करावयाची कागदपत्रे व इतर आवश्यक बाबींची पुर्तता जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयास करणे आवश्यक आहे. अन्यथा या खेळांच्या स्पर्धांच्या आयेाजनाचा संभाव्य
कार्यक्रम निश्चीत केला जाणार नाही व या खेळांच्या स्पर्धांचे आयेाजन ही रद्द
करण्यात येईल याची संबंधित खेळ संघटनांनी नोंद घ्यावी.