३० सप्टेंबर २०१६

जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धा सिंधुदुर्गनगरी ऐवजी वेंगुर्ला येथे होणार

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे अयोजन सन २०१६-१७ मध्ये करण्यात येत आहे.  जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धांचे आयोजन दि.१० ऑक्टोबर २०१६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे करण्याचे नियोजीत होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव या स्पर्धांच्या आयेाजन ठिकाणामध्ये बदल करण्यात येत आहे.
            जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धा सन २०१६-१७ चे आयोजन दि.१० ऑक्टोबर 2016 रोजी साई मंगल कार्यालय, मेन बस स्टॅण्ड जवळ, वेंगुर्ला येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्रीम. वसुधा मोरे यांच्याशी मो.क्र.७७७४८७६३९५, किंवा श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी मो.क्र९४०४०१०४०८ यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी        श्री. किरण बोरवडेकर यांनी केले आहे. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...