१४ जुलै २०१६

क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन


  महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 अन्वये "क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयेाजन" ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयेाजन करण्यात येते. या प्रशिक्षण शिबीरांमध्ये क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व त्यादृष्टीने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची क्रीडा विषयक उजळणी करुन दरवर्षी होणारे नियमातील बदल त्यांच्या निदर्शनास आणुन त्याची माहिती अवगत करुन देण्यात येते.
            सन 2016-17 मध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयेाजन श्री शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील निवडक क्रीडा शिक्षकांना यामध्ये सहभागी होता येईल. जिल्ह्यातील इच्छुक क्रीडा शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथेदि.20 जुलै 2016 पर्यंत सादर करावे.
            अर्जाचा विहीत नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या www.dsosindhudurg.blogspot.in या ब्लॉगवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...