राज्यात दर्जेदार क्रीडा
सुविधा निर्मीती करुन त्याद्वारे राष्ट्रीय व आंररराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत
या उद्देशाने राज्य शासनाने ’क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य’ नावाची
योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी व
क्रीडा साहित्य खरेदीसाठी शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे,
स्थानिक स्वराज्य संस्था यांना राज्यस्तरावरुन आर्थिक सहाय्य देण्यात येते.
त्यामध्ये क्रीडांगणे विकसित करणे, बंदिस्त प्रेक्षागृह उभारणे, क्रीडा सुविधा
तयार करणे व विविध खेळांचे टिकाऊ व अटिकाऊ स्वरुपाचे क्रीडा साहित्य खरेदी करणे इ.
बाबींकरिता शासनाच्या विहीत मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येते.
सन
२०१६-१७ या वर्षा करिता पात्र शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, युवा
मंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजने अंतर्गत विहीत नमुन्यातील
प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. १५ जुलै, २०१६ पूर्वी सादर करावेत. याबाबतचा शासन निर्णय, विहीत
नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsosindhudurg.blogspot.in या ब्लॉगवर 'क्रीडा सुविधा निर्मीतीसाठी आर्थिक सहाय्य' या टॅबवर उपलब्ध असून
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.