१७ ऑक्टोबर २०१५

जिल्‍हास्‍तरीय शालेय खो-खो स्‍पर्धा आयोजन कार्यक्रमामध्‍ये बदल


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य अंतर्गत जिल्‍हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येणा-या जिल्‍हास्‍तरीय शालेय खो-खो स्‍पर्धांच्‍या आयोजन कार्यक्रमामध्‍ये काही तांत्रिक कारणास्‍तव बदल करण्‍यात आलेला आहे.
जिल्‍हास्‍तरीय शालेय, ग्रामीण, व महिला खो-खो स्‍पर्धांचे आयेाजन दि.१९ ते २३ ऑक्‍टोबर २०१५ या कालावधीत जिल्‍हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे करण्‍यात येणार होते परंतु काही तांत्रिक कारणास्‍तव आयोजन कार्यक्रमामध्‍ये व ठिकाणामध्‍ये बदल करण्‍यात आला असून या स्‍पर्धांचा आयोजन कुडाळ हायस्‍कुल, कुडाळ येथे करण्‍यात येणार असून सुधारीत आयेाजन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दि.२५ ऑक्‍टोबर २०१५ – १६ वर्षाखालील मुले / मुली आणि महिला
दि.२६ ऑक्‍टोबर २०१५- १४ वर्षाखालील मुले / मुली आणि १७ वर्षाखालील मुले
दि.२७ ऑक्‍टोबर २०१५- १९ वर्षाखालील मुले / मुली आणि १७ वर्षाखालील मुली

तरी जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धांच्‍या आयोजनामध्‍ये झालेल्‍या बदलाची सर्व खेळाडु, क्रीडा शिक्षक, संबंधित शाळां यांनी नोंद घ्‍यावी व त्‍यानुसार स्‍पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...