०७ सप्टेंबर २०१५

जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धांच्या आयोजन कार्यक्रमामध्ये बदल



जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय शुटींग स्पर्धांचे आयोजन कार्यक्रमामध्ये बदल करण्यात येत आहे. या स्पर्धांचे आयोजन दि.10 सप्टेंबर 2015 रोजी करण्याचे नियोजीत होते. तथापी काही तांत्रिक कारणास्तव यामध्ये बदल करण्यात येत आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार या स्पर्धांचे आयोजन दिनांक28 सप्टेंबर 2015 रोजी उपरकर शुटींग रेंज, सावंतवाडी येथे करण्यात येणार आहे. तरी झालेल्या बदलाची सर्व शाळा, क्रीडा शिक्षक व खेळाडु यांनी नोंद घ्यावी व सुधारीत कार्यक्रमानुसार स्पर्धेसाठी उपस्थित राहावे सअे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्याशी मोक्र.8856093608 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...