जिल्हास्तर
सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल
स्पर्धांचे दि.27
व
28
जुलै
रोजी आयेाजन
क्रीडा
व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत
जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय
सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल
स्पर्धा सन 2015-16
चे
आयोजन करण्यात येत आहे.
या
स्पर्धांचे आयोजन जिल्हा
क्रीडा संकुल,
सिंधुदुर्ग
येथे करण्यात येणार आहे.
दिनांक
27
जुलै
2015
रोजी
14
वर्षाखालील
मुले व दिनांक 28
जुलै
2015
रोजी
17
वर्षाखालील
मुले व मुली यांच्या स्पर्धां
होणार आहेत.
14 वर्षाखालील
मुले वयोगटासाठी खेळाडु दि.24
सप्टेंबर
2001
रोजी
किंवा त्यानंतर जन्मलेला
असावा.
17 वर्षाखालील
मुली वयोगटासाठी खेळाडु दि.29
सप्टेंबर
1998
रोजी
किंवा त्यानंतर जन्मलेली
असावी.
तर
17
वर्षाखालील
मुले वयोगटासाठी खेळाडु दि.16
ऑक्टोबर
1998
रोजी
किंवा त्यानंतर जन्मलेला
असावा.
या
स्पर्धांना सकाळी 10.00
वा.
सुरुवात
करण्यात येणार आहे. सहभाग
घेऊ इच्छिणा-या
शाळांच्या संघांनी या स्पर्धांची
प्रवेशिका नविन नमुन्यामध्ये
व स्पर्धेचे शुल्क इत्यादी
दि.23
जुलै
2015
रोजी
पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयास सादर करणे आवश्यक
आहे.
तसेच
संघांनी स्पर्धादिवशी सकाळी
09.00
वा.
स्पर्धाठिकाणी
आपली उपस्थिती द्यावी.
स्पर्धा
प्रवेशिकेचा नविन नमुना तसेच
स्पर्धा आयोजनासंबंधी अधिक
माहितीसाठी जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयाशी संपर्क
साधावा असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी श्री मिलिंद
दिक्षीत यांनी केले आहे.