प्रतिवर्षी
राज्य शासनाच्यावतीने क्रीडा
व युवक सेवा संचालनालयाकडून
राज्यातील व जिल्ह्यातील
गुणवंत क्रीडापटु,
क्रीडा
मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता
यांच्या कार्याचे व योगदानाचे
मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव
व्हवा व प्रोत्साहन मिळावे
या उदे्देशाने राज्यस्तरावर
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाकडून जिल्हास्तरावर
जिल्हा क्रीडा पुरस्कार
देण्यात येतात.
सन
2014-15
मध्ये
जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाच्यावतीने गुणवंत
क्रीडा कार्यकर्ता(एक),
गुणवंत
क्रीडा मार्गर्शक(एक)
व
गुणवंत खेळाडु दोन (एक
पुरुष व एक महिला)
या
पुरस्कारांचे वितरण करण्यात
येणार आहे.
प्रमाणपत्र,
स्मृतिचिन्ह
व रुपये रोख दहा हजार असे या
पुरस्कारांचे स्वरुप आहे.
गेल्या
दहा वर्षात सांघिक अथवा वैयक्तिक
मान्यताप्राप्त क्रीडा
प्रकारात नॅशनल स्कुल गेम्स,
वरीष्ठ
राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
मध्ये प्रतिनिधीत्व केलेला
खेळाडु इत्यादींना मार्गदर्शन
केलेले तसेच राज्य व राष्ट्रीयस्तरावर
पदक विजेते खेळाडु तयार केले
असतील असे क्रीडा मार्गदर्शक
हे क्रीडा मार्गदर्शक या
पुरस्काराकरीता अर्ज सादर
करुन शकतात.
क्रीडा
क्षेत्रात विकासात्मक कार्य,
संघटनात्मक
कार्य व क्रीडा प्रचार व प्रसार
अशा प्रकारामध्ये भरीव कार्य
केलेल्या व्यक्ति गुणवंत
क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी
अर्ज सादर करुन शकतात तर गुणवंत
खेळाडु पुरस्काराकरीता राज्य
व राष्ट्रीस्तरावरील
मान्यताप्राप्त खेळाच्या
अधिकृत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय
कामगिरी करणा-या
खेळाडूंना अर्ज सादर करता
येतील.
या
पुरस्करांसाठी पात्र व
इच्छुकांनी विहीत नमुन्यातील
आपले अर्ज संपुर्ण तपशीलवार
माहितीसह भरुन,
आवश्यक
कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय,
सिंधुदुर्ग
येथे दिनांक 31/12/2014
पर्यंत
कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
अधिक
माहितीकरीत जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग
dsosindhudurg.blogspot.in
येथे
पहावे किंवा श्री सचिन निकम
क्रीडा अधिकारी यांच्याशी
मो.क्र.8856093608
या
क्रमांकावर संपर्क साधण्यात
यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी श्री मिलिंद दिक्षित
यांनी केले आहे.