०३ ऑक्टोबर २०१४

शासनातर्फे क्रीडा शिक्षकांसाठी राज्‍य व जिल्‍हास्‍तरावर प्रशिक्षण शिबीर आयोजन


    
     राज्‍याचे क्रीडा धोरण सन 2012 मधील मुद्दा क्र.6(5) नुसार खेळामधील बदलेले तंत्रज्ञान, प्रशिक्षणच्‍या पध्‍दती, नवीन खेळ, खेळांची शास्‍त्रोक्‍त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्‍यक आहे. तालुका, जिल्‍हा, विभाग व राज्‍यस्‍तरावर क्रीडा शिक्षकांच्‍या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्‍यासाठी राज्‍यातील शालेय विद्यार्थ्‍यांना योग्‍य क्रीडा प्रशिक्षण मिळण्‍यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यायावत प्रशिक्षण असणे आवश्‍यक आहे. यासाठी शासनाने क्रीडा शिक्षंकांसाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्‍याचा निर्णय घेतलेला आहे.
     शासनातर्फे राज्‍य व जिल्‍हास्‍तरावर क्रीडा शिक्षकांसाठी या प्रशिक्षण शिबीरांचे आयेाजन करण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीराव्‍दारे विविध वयोगटातील खेळाडु घडविणे व खेळाडुच्‍या कामगिरीत प्राविण्‍य निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने क्रीडा शिक्षकांच्‍या ज्ञानात भर पडावी व त्‍यादृष्‍टीने जिल्‍हा्यातील क्रीडा शिक्षकांची क्रीडा विषयक उजळणी करुन दरवर्षी होणारे नियमातील बदल त्‍यांच्‍या निदर्शनास आणुन त्‍याची माहिती अवगत करुन देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय मास्‍टर्स ट्रेनर प्रशिक्षण घेणा-या क्रीडा शिक्षकांना प्रवास खर्च, निवास व भोजन, प्रशिक्षण गणवेश इत्‍यादी सुविधा शासनाकडून देण्‍यात येणार आहेत.
     राज्‍यस्‍तरीय मास्‍टर्स ट्रेनर शिबीराकरीता जिल्‍ह्यातील सर्वोत्‍तम 10 क्रीडा शिक्षकांना निवडण्‍यात येणार असून या मास्‍टर्स ट्रेनर मार्फत जिल्‍हास्‍तरावर प्रशिक्षण घेवून क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय शिबीराकरीता ज्‍यांची किमान 10 वर्षे सेवा शिल्‍लक आहे असे क्रीडा शिक्षक, ज्‍या शाळांमधील अधिकाधिक संघ शालेय क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होतात अशा शाळांचे क्रीडा शिक्षक, राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावरील खेळाडु तसेच उच्‍चतम क्रीडा अ‍र्हता असणारे क्रीडा शिक्षक इत्‍यादींना या शिबीरामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी अर्ज सादर करता येतील.
     जिल्‍ह्यातील सर्व उच्‍च माध्‍यमिक, माध्‍यमिक व प्राथमिक शाळांमधील क्रीडा शिक्षक व मुख्‍याध्‍यापक यांनी नोंद घेवून क्रीडा शिक्षकांचे राज्‍यस्‍तरीय मास्‍टर्स ट्रेनर व जिल्‍हास्‍तरीय प्रशिक्षण शिबीराकरीता विहीत नमुन्‍यातील अर्ज दिनांक 10/10/2014 पर्यंत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावे. अर्जाचा विहीत नमुना जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे तसेच कार्यालयाचा अधिकृत ब्‍लॉग dsosindhudurg.blogspot.in येथे उपलब्‍ध आहे. अधिक माहिती करीता श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्‍याशी मो.क्र.9404010408 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्‍यात येत आहे. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...