१० सप्टेंबर २०१४

शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नविन वयोगटांचा समावेश

     राष्ट्रीय खेळ महासंघामार्फत सन २०१४-१५ या वर्षी आयोजीत करण्यात येणा-या शालेय राष्ट्रिय स्पर्धांमध्ये पुढील खेळांमध्ये नव्याने वयोगट समाविष्ट करण्यात आला आहे. बॉल बॅडमिंटन, कॅरम,चॉयक्वॉदो७ वर्ष (मुले/मुली) रोप स्किपींग, थांगता मार्शल आर्ट १४ वर्ष (मुले/मुली) स्क्वॅश १९ वर्ष (मुले/मुली) या प्रमाणे नविन वयोगटांचा समावेश करण्यात आला आहे.यापुर्वी सदर क्रीडा प्रकारातील इतर वयोगटांच्या स्पर्धमध्ये  सहभागी झालेल्या खेळाडुंना त्याच क्रीडा प्रकारात पुन्हा सहभागी होता येणार नाही.


       त्यानुसार सदर खेळांच्या जिल्हास्तरिय स्पर्धाँचे आयोजन करण्यात येत असुन कॅरम या खेळाच्या १७ वर्ष (मुले/मुली) वयोगटाच्या स्पर्धांचे आयोजन दि. १५/०९/२०१४ रोजी डॉ.एस.एस.कुडाळकर हायस्कुल मालवण येथे करण्यात येणार आहे. उर्वरीत खेळांच्या स्पर्धा संबंधीत एकविध खेळ संघटनांच्या सहकार्याने घ्यावयाच्या आहेत तरी, सदर खेळांचा राष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रम निश्चित झाला असुन जिल्हास्तरिय स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी संबंधीत खेळ संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...