अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा 2014-15
सचिवालय जिमखानाव्दारे अखिल भारतीय
नागरी सेवा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा संघ निवडण्याकरीता
निवड चाचणी घेण्यात येते. सदर निवड चाचणी करीता जिल्ह्यातील शासकीय खेळाडू कर्मचा-यांना
सहभाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी आपल्या कार्यालय प्रमुखांच्या मान्यतेने विहीत
नमुन्यातील अर्ज भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिनांक 30 ऑगष्ट 2014 पर्यंत
कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.
इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज डाऊनलेाड करण्याकरीता बातम्या या स्तंभामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.