या कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर ग्रामीण क्रीडा स्पर्धा सन 2012-13 मधील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या खेळाडुंना / संघांना बक्षिसाची रक्कम वितरीत करण्यात येणार अाहेृ. करीता या स्पर्धामधील उपरोक्त प्रमाणे प्राविण्य प्राप्त खेळाडुंनी / संबधित शाळांनी / संबधित ग्रामसेवकांनी खेळाडुंच्या बॅक खात्याचा तपशील विहीत नमुन्यात या कार्यालयास तात्काळ सादर करावा. संबंधित खेळाडुंच्या बॅक खात्यावर RTGS/NEFT व्दारे सदरची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
सन 2012-13 मध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक याप्रमाणे प्राविण्य प्राप्त खेळाडुंची माहिती व बँक माहितीचा तपशील सादर करण्याचा विहीत नमुना या ब्लॉगवरील पायका योजना या बटनावर क्लिक करुन दिलेल्या लिंक वर पाहता येईल.
तरी बँक माहितीचा तपशील भरुन प्रत्यक्ष अथवा ईमेलव्दारे या कार्यालयास सादर करण्यात यावा. या कार्यालयाचा ईमेल -dsoff.sindhudurg@dsys.maharashtra.gov.in असा आहे. अधिक माहिती करीता श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्याशी 9404010408 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडुन करण्यात येत आहे.