गिर्यारोहण, पॅराग्लायडींग / पॅरासेलिंग इत्यादींसारख्या
साहसी खेळातील तज्ञ व्यक्तिंना आवाहन
साहसी
क्रीडाप्रकारातील ट्रेकिंग,
माउंटनिअरींग,
स्कीईंग,
स्नो बोर्डींग,
पॅरासेलिंग,
हॅंगग्लायडींग,
पॅराग्लायडींग,
जलक्रीडा (वॉटरस्पेार्टस) इत्यादींच्या मोहीमा, कॅम्प, खेळ, स्पर्धा आयोजित करणा-या
सर्व संस्थांनी / व्यक्तिंची शासनाकडे नोंदणी होण्याकरीता जिल्हा क्रीडा
अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या समिती
मार्फंत जिल्ह्यातील साहसीक्रीडा प्रकारात कार्यरत व्यक्ति तसेच संस्था यांची
नोंदणी करण्यात येवून नोंदणी प्रमाणपत्र संबंधित संस्था / व्यक्तिंना देण्यात
येणार आहे. अशा व्यक्ति / संस्था यांची कागदपत्र तपासणी व नोंदणी प्रमाणपत्र
देण्याकरीता जमिनीवरील,
पाण्यातील व हवेतील साहसी क्रीडा प्रकारातील तज्ञ व्यक्तिींची समितीमध्ये
नियुक्ती करण्यात येणार आहे. करीता या समितीमध्ये नामनिर्देशीत सदस्य म्हणुन
नियुक्ती होण्याकरीता जिल्ह्यातील तज्ञ व्यक्तिंनी किंवा ज्यांनी या साहसी
प्रकारांमधील मान्यताप्राप्त संस्थामधील अभ्यासक्रम पुर्ण केले आहेत अशा व्यक्तिंनी
दिनांक 6 ऑगस्ट 2014 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्जासह त्याबाबतची
कागदपत्रे,
प्रमाणपत्रं इत्यादी जोडून सादर करावे. तसेच आपले या साहसी क्रीडा प्रकारातील
कार्याची माहिती इत्यादी सादर करावी.
याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
|
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
२८ जुलै २०१४
जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा. निविदा नमुन्याची किंमत : रु. ३ , ०००/-(अक्षरी रु.ती...