११ जुलै २०१४


जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्‍पर्धांचे आयोजन

      जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रतिवर्षी विविध शासकीय क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात येते. सन 2014-15 मध्‍ये विविध स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. त्‍यापैकी सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्‍पर्धा सन 2014-15 आयोजनाचा कार्यक्रम निश्‍चित करण्‍यात आलेला आहे.
स्‍पर्धांचा आयोजन कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
दिनांक
वयोगट
ठिकाण
18/7/2014
14 वर्षाखालील मुले- सबज्‍युनियर
जिल्‍ह क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग
19/7/2014
17 वर्षाखालील मुले- ज्‍युनियर
19/7/2014
17 वर्षाखालील मुली- ज्‍युनियर

स्‍पर्धेकरीता पात्र खेळाडुंची जन्‍म तारीख पुढील प्रमाणे असणे आवश्‍यक आहे.
अ.क्र.
वयोगट
जन्‍मतारीख
1
14 वर्षाखालील मुले- सबज्‍युनियर
दि. 5 ऑक्‍टोबर 2000 रोजी किंवा त्‍यानंतर जन्‍मलेला असावा
2
17 वर्षाखालील मुले- ज्‍युनियर
दि. 22 ऑक्‍टोबर 1997 रोजी किंवा त्‍यानंतर जन्‍मलेला असावा
3
17 वर्षाखालील मुली- ज्‍युनियर
दि. 15 ऑक्‍टोबर 1997 रोजी किंवा त्‍यानंतर जन्‍मलेला असावा

       स्‍पर्धेमध्‍ये भाग घेउु इच्छिणा-या संघांनी आपल्‍या संघांची प्रवेशिका दिनांक 15 जुलै 2014 पर्यंत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास आवश्‍यक ते शुल्‍क भरुन सादर करावी. या स्‍पर्धेबाबत अधिक माहिती करीता श्री सचिन निकम (क्रीडा अधिकारी) यांच्‍याशी मो.क्र.9404010408 या क्रमांकावर संपर्क साधण्‍यात यावा असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.


जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...