विदयार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांचा
विकास क्रीडा शिक्षकांनी करावा
– श्री.मिलींद
बांदिवडेकर
क्रीडा व युवक सेवा
संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा
परिषद, सिंधुदुर्ग यांचे वतीने जिल्हातील क्रीडा शिक्षकांसाठी
दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण
शिबीराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे
करण्यात आले होते. दि.27 मार्च
2018 रोजी या प्रशिक्षण शिबीरास सुरुवात करण्यात आली होती. या प्रशिक्षण
शिबीरामध्ये खेळांमधील बदलते आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या
पध्दती, खेळामधील कौशल्यांची ओळख, नवीन
खेळांची ओळख प्रशिक्षणार्थी शिक्षकांना करुन देण्यात आली. त्यामध्ये
मैदानी, कुस्ती, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन, ज्युदो, व्हॉलीबॉल,
बास्केटबॉल, हॉकी, जलतरण,
धनुर्विद्या, तायक्वांदो, बुध्दिबळ, शुटींग इत्यादी खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले. तसेच क्रीडा मानसशास्त्र, डोपिंग, संतुलित आहार, शरीररचना व शरीरक्रीया शास्त्र,
इत्यादी विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनही देण्यात आले.
या प्रशिक्षण शिबीराचा समारोप कार्यक्रम दि. 05 एप्रिल 2018 रोजी संपन्न झाला, या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री. मिलिंद बांदीवडेकर
हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. आपल्या मनोगतात श्री बांदीवडेकर
यांनी क्रीडा शिक्षकांनी स्थानिक विदयार्थ्यांमधील नैसर्गिक क्रीडा गुणवत्तेचा शोध
घ्यावा व या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करुन विदयांर्थ्यांना
खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण द्यावे. तसेच त्यांच्यातील क्रीडा
गुणांचा व क्षमतांचा अपेक्षित विकास करुन त्यांच्यामध्ये उच्चत्तम कामगिरी करण्याची
क्षमता निर्माण करावी. त्यामुळे राज्याचा आणि देशाचा नाव लौकीक
घडविणारे खेळाडू या जिल्ह्यामध्ये निर्माण होतील असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.किरण बोरवडेकर यांनीही प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मागदर्शन केले. जसे विमान विमानतळावर सुरक्षित असते परंतु त्यासाठी त्याची निर्मिती झालेली
नाही. आकाशात उडणे हे त्याचे कर्म आहे. त्याच प्रमाणे क्रीडा शिक्षकांनी विदयार्थ्यांना मैदानावर शारीरिक शिक्षण व
खेळांचे प्रशिक्षण देणे हे क्रीडा शिक्षकांचे कर्म आहे. या प्रशिक्षणाव्दारे
मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करुन जास्तीत जास्त खेळाडू निर्माण करावे व जिल्ह्याच्या
क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन विविध खेळांचे मुलभुत ज्ञान, अदयावत माहीती तसेच खेळातील तांत्रिक बाबींचे ज्ञान आम्हाला मिळाले असे मनोगत
प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रीडा
अधिकारी श्री.सचिन निकम यांनी केले. यावेळी
मास्टर ट्रेनर श्री. बयाजी बुराण, श्री.
सुनिल भाटिवडेकर, श्री.हिराचंद
तानावडे, श्री.अजय सावंत, श्री.विश्वनाथ सावंत, श्री.शैलेंद्र सावंत, श्री.चंद्रकांत
काणकेकर, श्री.विठ्ठल खंडवी, श्री.नवलसिंग तडवी, श्री.हनुमंत जोपळे व जिल्हातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या प्रशिक्षण
शिबीराच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक, श्री.उदय पवार, क्रीडा अधिकारी, श्रीम.मनिषा पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी यांनी अथक
परिश्रम घेतले.