१६ ऑगस्ट २०१७

सन 2017-18 मधील शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सन 2017-18 मध्ये या स्पर्धांच्या आयोजना संदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ज्या खेळांच्या स्पर्धांचे आयेाजन करावयाचे आहेत त्यामध्ये काही खेळांसाठी नविन वयोगटांचा समावेश करण्यात आलेला आहे.त्यानुसार खालील प्रमाणे वयोगटानुसार जिल्हास्तरीय स्पर्धांचे अयोजन करण्यात येईल.
1.     कुस्ती फ्री स्टाईल - 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
2.     रग्बी - 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
3.     रस्सीखेच -             14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
4.     पॉवरलिफ्टींग - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
5.     डॉजबॉल - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
6.     फिल्ड आर्चरी - 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
7.     कॉर्फबॉल - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
8.     कुडो - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
9.     मिनी गोल्फ - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
10. स्पीड बॉल - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
11. टेबल सॉकर - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
12. टेंग सुडो  -14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
13. वुडबॉल - 17,19 वर्षाखालील मुले व मुली
14. सिलंबम - 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
            वरीलपैकी कुस्ती व डॉजबॉल वगळता इतर सर्व खेळ हे विनाअनुदानित खेळ प्रकार असुन जिल्ह्याच्या संबंधित खेळ संघटनेने या कार्यालयाकडे सर्व कागदपत्रांची व तांत्रिक बाबींची पुर्तता केल्यानंतरच या खेळांचे आयोजन जिल्ह्यामध्ये करण्यात येईल. त्यासाठी दि.24 ऑगस्ट 2017 पर्यंत संबंधित खेळ संघटनांनी सर्व कागदपत्रांची व तांत्रिक बाबींची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास पुर्तता करणे अनिवार्य राहील. तथापि वरीलपैकी खेळाच्या विभागीय स्पर्धांच्या आयोजनापुर्वी जिल्हास्तरीय स्पर्धांच्या आयोजनाची कार्यवाही होणे आवश्यक असल्याने त्यासंबंधीत खेळ संघटनांनी वेळेत या कार्यालयाशी संपर्क साधावा, याची सर्वस्वी जबाबदारी खेळ संघटनेची राहील.

            वरीलप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शालेय विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, पालक, क्रीडा संघटना इत्यांदीनी घ्यावी. तसेच चॉकबॉल या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे पुढील आदेश होईपर्यंत केले जाणार नाही. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...