क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
करण्यात येते. प्रतीवर्षी या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील बहूतांशी शाळा, विद्यालये,
कनिष्ठ महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांचे अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे
दि.31 /5/2017 रोजीच्या परिपत्रकानुसार सन 2017-18 मध्ये आयोजित करण्यात येणा-या
सर्व शालेय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडुंचे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.
परिपत्रकातील निर्देशानुसार खेळाची प्रवेशिका सादर करतांना खेळाडुंच्या इतर
माहितीसह त्यांचा आधार क्रमांक प्रवेश अर्जावर नमुद करणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला, शाळेचा
दाखला, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांवरील जन्म तारखेच्या नोंदी एकसारख्याच असणे
आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढलेले नसतील अशा
विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासंबंधी आवश्यक सुचना शाळेचे क्रीडा शिक्षक
/मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी देवून खेळाडुंचे आधार कार्ड काढण्याची कार्यवाही
स्पर्धांपुर्वी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने
करण्यात येत आहे.