०१ एप्रिल २०१७

जिल्‍हास्तर क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर 2016-17 भोजन निविदा

जा.क्र.जिक्रीअ/क्रीशिप्र/2016-17/का-4/                                                                   दि.29/3/2017
जाहीर सूचना

            जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन 2016-17 मध्‍ये जिल्‍हास्‍तर क्रीडा शिक्षकांचे (दहा दिवसीय) प्रशिक्षण शिबीर दि.15 ते 24 एप्रिल 2017 या कालावधीत करण्याचे प्रस्तावित आहे. प्रशिक्षण कालावधीत एकूण 110 जणांच्या चहा, नाष्टा, दुपार भोजन व रात्रीचे भोजन व्यवस्थेसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
            भोजनाची (चहा, नाष्टा, दुपारी व रात्री भोजन) सेवा जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी या ठिकाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. इच्छुक हॉटेल व्यावसायिक/केटरर्स/पुरवठादार यांनी कोरे दर प्रपत्रामध्ये प्रस्तावित कामाचे दरपत्रक सादर करणे आवश्यक आहे. कोरे दर प्रपत्र दि.29/03/2017 ते दि.05/04/2017 या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे दि.05/4/2017 रोजी सायं. 04.00 वा. पर्यंत वितरीत करण्यात येतील.  
            सदर दरपत्रक प्रक्रीया ही दोन लिफाफा पध्दतीने करण्यात येईल. त्यासाठी इच्छुक पुरवठादार यांना 1) तांत्रिक लिफाफा (ज्यामध्ये कागदपत्रांचा तपशील)  व 2) व्यावसायिक लिफाफा (ज्यामध्ये दर नमूद असेल) या पध्दतीने दरपत्रके सादर करावी लागतील. सीलबंद दरपत्रके दि.05/04/2017 रोजी सायं. 06.00 वा.पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ए ब्लॉक, तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे सादर करावेत शक्य झाल्यास प्राप्त दरपत्रके दि.06/04/2017 रोजी सकाळी 11.00 वा. उघडण्यात येतील.
        कोणतेही कारण न देता दरपत्रके स्वीकारणे अथवा नाकरणेचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीतांनी  राखून ठेवले आहेत.             

दिनांक-29/3/2017
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी
                                                                                
जिल्हा क्रीडा अधिकारी,

सिंधुदुर्ग

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...