केंद्र शासनाच्या वतीने ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य
पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार सन 2017 साठी
नामांकने मागविण्यात येत आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने या पुरस्कारांसाठी
राज्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आंतरराष्ट्रीस्तरावर
क्रीडा क्षेत्रामध्ये 1 जानेवावरी 2013 ते 31 डिसेंबर 2016 कालावधीत सतत चार वर्षे
उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडु अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज सादर करु शकतात, आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडु ज्यांनी
ज्यांनी आपल्या खेळाडु म्हणुन कारकिर्द संपल्यानंतर क्रीडा क्षेत्राच्या
विकासासाठी कार्य केले असेल असे खेळाडु ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज
सादर करु शकतात, दि. 1 जानेवावरी 2013 ते 31 डिसेंबर 2016
कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या
खेळाडुंना मार्गदर्शन केलेले क्रीडा मार्गदर्शक द्रोणाचार्य पुरस्कारासाठी अर्ज
सादर करु शकतात, दि. 1 जानेवावरी 2013 ते 31 डिसेंबर 2016
कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच
ऑलिंम्पीक स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा जागतिक स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा
इत्यादी स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारे खेळाडु राजीव गांधी खेलरत्न
पुरस्कारासाठी अर्ज सादर करुन शकतात तर मागील चार वर्षात देशाच्या क्रीडा
क्षेत्राच्या विकासासाठी व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणा-या उद्योग
जगतातील कंपन्या, सार्वजनिक / खाजगी संस्था इत्यादी राष्ट्रीय
खेल प्रोत्साहन पुरस्कारासाठी अर्ज सादर करु शकतात.
सर्व
पुरस्कारांसाठी विहीत नमुन्यात सर्व कागदपत्रांसह अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे दि.14 मार्च 2017 पर्यंत सादर करणे आवश्यक
आहे. पुरस्कारांची सविस्तर माहिती व अर्जाचा विहीत
नमुना www.yas.nic.in येथे उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता श्री सचिन
निकम क्रीडा अधिकारी यांचेशी 8999397025 या क्रमांकावर अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क
साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.