क्रीडा व
युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2016-17 मध्ये आयोजित
करावयाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये 39 विविध
खेळांचा समावेश करण्यात आलेला होता व या 39 खेळांच्या तालुका/जिल्हास्तरीय
स्पर्धांचे आयोजन कार्यलयाच्या वतीने करण्यात येत आहे.
क्रीडा व
युवक सेवा संचालनालयाच्या सुचनेनुसार उर्वरीत क्रीडा प्रकारांचे आयोजन शालेय
क्रीडा स्पर्धंमध्ये करण्यात येणार असून
त्यानुसार लंगडी या खेळाच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन सिंधुदुर्ग
जिल्हा लंगडी असोसिएशन, सिंधुदुर्ग च्या सहकार्याने दि.
१६ डिसेंबर 2016 रेाजी करण्यात येत आहे. या स्पर्धां 19 वर्षाखालील मुले व मुली
या गटात होणार असून या स्पर्धांचे आयेाजन जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे करण्यात
येणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी इच्छुक शाळांनी आपले प्रवेश अर्ज व प्रवेश
शुल्क स्पर्धास्थळी आयोजकांजवळ जमा करावयाचे आहे.
या
स्पर्धांच्या आयोजनासंबंधी अधिक माहितीसाठी श्री.उदय पवार, क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी ९८९०७७०६४९ अथवा श्री संजय पेंडुरकर
यांच्याशी 942२392790 या मोबाईल क्रमांकावर
संपर्क साधावा.
जिल्ह्यातील
सर्व शाळा, विद्यालये, खेळाडु, क्रीडा संघटना इत्यादी यांनी नोंद घ्यावी व आपल्या
शाळा / विद्यालयाचे संघ स्पर्धेला उपस्थित ठेवावे असे जाहीर आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी केले आहे.