०९ डिसेंबर २०१६

फुटसाल, मार्डन पेन्टाथलॉन, स्पोर्ट डान्स, म्युजिकल चेअर, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, लंगडी इ. खेळांच्या जिल्हा संघटनांची बैठक दि.13 डिसेंबर रोजी



            क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2016-17 मध्ये आयोजित करावयाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये 39  विविध खेळांचा समावेश करण्यात आलेला होता व या 39 खेळांच्या तालुका/जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन कार्यलयाच्या वतीने करण्यात संपन्न झाले आहे.   
            क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सुचनेनुसार उर्वरीत क्रीडा प्रकारांचे आयोजन शालेय क्रीडा स्पर्धंमध्ये करण्यात येत असून आयोजन करावयाचे खेळ पुढील प्रमाणे आहेत - 1. फुटसाल, 2.मॉडर्न पेंट्याथलॉन, 3.म्युजिकल चेअर, 4.स्पोर्ट डान्स, 5.हाफकिडो बॉक्सिंग, 6.बुडो मार्शल आर्ट, 7.मॉनटेक्स बॉल क्रिकेट, 8.पेंट्याक्यु, 9.लंगडी, 10.जंपरोप, 11.सिलंबम,
            वरील सर्व खेळ हे विनाअनुदानित खेळ प्रकार असल्याने जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा अयेाजनाची आर्थिक व तांत्रिक बाबींची जबाबदारी संबंधित संघटनेची राहील. या स्पर्धांच्या आयोजनाचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक असून काही खेळांच्या विभागीय स्पर्धांसाठी अत्यंत कमी कालवधी असल्याने वरील खेळांच्या जिल्ह्यातील एकविध जिल्हा खेळ संघटना यांनी संघटना अधिकृत असल्याबाबतची सादर करावयाची कागदपत्रे व इतर आवश्यक बाबींची पुर्तता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास करणे आवश्यक आहे.
            या खेळांच्या जिल्हा संघटनांची बैठक दिनांक13 डिसेंबर 2016 रोजी सायं.04.00वा. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आयेाजित करण्यात येत आहे. सदर खेळाच्या जिल्हा संघटनांचे प्रतिनीधी यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावे, अन्यथा या खेळांच्या स्पर्धांच्या आयेाजनाचा संभाव्य कार्यक्रम निश्चीत केला जाणार नाही व या खेळांच्या स्पर्धांचे आयेाजन ही रद्द करण्यात येईल याची संबंधित खेळांनी नोंद घ्यावी. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...