क्रीडा
व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद
सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त
विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय चॉकबॉल स्पर्धांचे आयेाजन करण्यात येणार आहे.
दि.२३ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी ०९.०० वा. वराडकर हायस्कुल, कट्टा ता. मालवण येथे या स्पर्धां होणार आहेत. या स्पर्धांचे आयोजन १९
वर्षाखालील मुले व मुली या गटात करण्यात येणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी श्री संजय
पेंडुरकर, जिल्हा संघटना – ९४२२३९२७९०, किंवा
श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्याशी ८८५६०९३६०८ या क्रमांकावर संपर्क साधण्यात
यावा.
जिल्ह्यातील
खेळाडु, क्रीडा शिक्षक, शाळांनी
नोंद घ्यावी व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे
असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री राघोबा मिठबावंकर व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित
यांनी केले आहे.