भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाव्दारा युवक व पौगंडावस्थेतील मुला व मुलींच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविणासाठी नोंदणीकृत संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे. युवक व पौगंडावस्थेतील मुलांच्या अंगी असलेल्या क्षमतांच्या सर्वांगीन विकासासाठी नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास इ.चा विकास करुन त्यांची शक्ती देशहिताकडे वळविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता, साहसी उपक्रम, जोखीम पत्कारणे, कौशल्य शिक्षण, समपुदेशन, व्यवसाय मार्गदर्शन इ. च्या निवासी व अनिवासी शिबीर आयोजनासाठी रु.65,000/- ते 5,00,000/- लाखांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती केंद्रशासनाच्या www.yas.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या नोंदणीकृत संस्थांनी आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि.28/10/2014 पर्यंत सादर करावेत.
वरील वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करावे तसेच या कार्यक्रमाच्या Guidlines पाहण्यासाठी व अर्ज डाऊनलोड करुन घेण्याकरीता शेजारील दिलेल्या विविध अर्ज नमुने या कॉलमधील लिंकवर क्लिक करावे.