२१ ऑक्टोबर २०१४

जिल्हा स्तर युवा महोत्सव आयोजन समितीच्या तज्ञ सदस्यांची निवड करण्यांकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने सन २०१४-१५ मध्‍ये जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. या करीता शासन निर्णय क्र.युकयो-२०१२/प्र.क्र.६७/क्रीयुसे-३, दि.०६ जानेवारी २०१४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अन्‍वये जिल्‍हास्‍तर आयोजन समिती गठीत करण्‍यात येणार असून या समितीमध्‍ये मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा हे अध्‍यक्ष, जिल्‍हा क्रीडा अधिकारी हे सदस्‍य सचिव तर नेहरु युवा केंद्र समन्‍वयक, जिल्‍हा माहिती अधिकारी, राष्‍ट्रीय सेवा योजना प्रमुख संबंधित विद्यापीठ हे सदस्‍य असून या समितीवर संगीत तज्ञ / विशारद / परीक्षक दोन प्रतिनिधी यांची नियुक्‍ती करावयाची आहे. करीता इच्‍छुकांनी आपले अर्ज ए फोर कागदावर स्‍वहस्‍ताक्षरात अथवा टंकलिखित करुन आपल्‍या संपुर्ण माहिती व बायोडेटासह जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक ३१ ऑक्‍टोबर २०१४ पुर्वी सादर करावयाचे आहेत. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...