०३ सप्टेंबर २०१४

शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार
अर्ज सादर करण्‍याकरीता दिनांक 15 सप्‍टेंबर 2014 पर्यंत मुदतवाढ
                    महाराष्‍ट्र शासनाच्‍या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार देण्‍याची योजना कार्यान्वित असून यामध्‍ये राज्‍यातील सर्वात्‍कृष्‍ट खेळाडू, (साहसी व अपंग खेळाडूंस) संघटक/कार्यकर्ते यांच्‍यासाठी शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार’, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्‍कृष्‍ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्‍कार, महिला कार्यकर्तीस जिजामाता राज्‍य क्रीडा पुरस्‍कार तसेच जेष्‍ठ क्रीडा महर्षीकरीता शिछपत्रपती राज्‍य क्रीडा जीवनगौरव पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतात.                  
              सन 2012-13 व 2013-14 या वर्षांसाठी मान्‍यता प्राप्‍त खेळांच्‍या अधिकृत राज्‍य संघटनेमार्फत त्‍या त्‍या आंतरराष्‍ट्रीय/ राष्‍ट्रीय स्‍तरावरील कनिष्‍ठ व वरिष्‍ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू (साहसी व अपंग खेळाडूसह), कार्यकर्ते / संघटक, तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहीत नमुन्‍यातील अर्ज संबंधित राज्‍य संघटनेचा ठराव व शिफारशीसह दिनांक 15 सप्‍टेंबर 2014 पर्यंत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास परिपुर्ण प्रस्‍ताव सादर करावेत.याबाबत अधिक माहितीसाठी शालेय शिक्षणव क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.शिछ.पु-2011/प्र.क्र.198/2011/क्रीयुसे-2, दि.1 ऑक्‍टो.2012 चे अवलेाकन करावे. सदर शासन निर्णय महाराष्‍ट्र शासनाच्‍या संकेतस्‍थळावर (www.maharashtra.gov.in) वर उपलब्‍ध  असून त्‍याचा संगणक सांकेतांक क्रमांक2012092614273605000 असा आहे.


जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...