जिल्हा क्रीडा संकुल नियम


जिल्‍हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग
व्‍दारा जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग
संकुल वापरावयाचे नियम
१.      नाव
२.
क्रीडा संकुलाचे नाव जिल्‍हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग असे राहील.
     नोंदणीकृत कार्यालय
३.
जिल्‍हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गचे नोंदणीकृत कार्यालय हे जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयाशी संलग्‍न राहील. महाराष्‍ट्र शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्‍या आदेशांचे पालन सदर कार्यालयाकडून केले जाईल.
२.     उद्देश
  जिल्‍हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.
i
संगीत, साहीत्‍य, नृत्‍य, नाटळ, खेळ,गिर्यारोहण आणि इतर चांगल्‍या कला यांना उत्तेजन देऊन त्यांचा विकास करणे.
ii
सभेसाठीच्या जागेची व्यवस्था करणे, बैठया  व मैदानी खेळांना सुविधा पुरविणे व सभासदांना करमणुकीच्या व विश्रांतीच्या जागेची सोय करणे.
iii
संकुलाच्या सभासदांसाठी वाचनालयाची सुविधा पुरविणे.
iv
सभासदांमध्ये सामाजिक व सांस्‍कृतिक उपक्रमाचे आयोजन करणे व महाराष्‍ट्र शासनाच्‍या अनेक कार्यालयामध्‍ये काम करणा-यांसाठी या उपक्रमांचा लाभ मिळवून देणे.
v
कोणतीही सभा, स्पर्धा / बैठका व मैदानी खेळांचे सामने, सांस्‍कृतिक स्‍पर्धा आयोजन करणे व भाग घेणे
vi
मोठा रिकामा हॉल व मोकळी जागा, मि‍टींग लग्‍नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी पुरविणे तसेच क्रीडा संकुलासाठी तजवीज करणे.
vii
सभासदांच्‍या पाहुण्‍यांसाठी फक्‍त बैठे खेळ खेळण्‍यासाठीची सुविधा योग्‍य त्‍या शुल्‍कासह करुन देणे.
जिल्‍हा क्रीडा संकुलाची वर्गणी सिंधुदुर्ग जिल्‍हयातील  सर्व व्‍यक्‍तींना खुली असेल.
सदरच्‍या वर्गणीमध्‍ये पुढील बाबींचा समावेश असेल.
३.         वर्गणी
आजीवन वर्गणीदार –
       कोणतीही व्‍यक्‍ती जी आगाऊ रक्‍कम रु.१,००,०००/- एका व्‍यक्‍ती करीता किंवा रक्‍कम रु.२,००,०००/- कुटुंबाकरीता भरणा करत असेल तर ती व्‍यक्‍ती किंवा त्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबाला जिल्‍हा क्रीडा संकुलामध्‍ये आजीवन वर्गणीदार म्‍हणून प्रवेश देण्‍यात येईल. आजीवन वर्गणीदारांकरीता विहित केलेला कालावधी पूण्र होईपर्यंत आजीवन वर्गणीदारांना कोणतेही शुल्‍क भरण्‍याची आवश्‍यकता राहणार नाही. आजीवन वर्गणीदार कुटुंबामध्‍ये वर्गणी देणारी व्‍यक्‍ती तिचा पती किंवा पत्‍नी आणि त्‍यांची दोन १८ वर्षापेक्षा कमी वय असलेली दोन मुले या चारच व्‍यक्‍तींचा समावेश राहील. आजीवन वर्गणीदारांचा कालावधी २० वर्षे राहील त्‍यानंतर आजीवन वर्गणीची रक्‍कम जमा करुन आजीवन वर्गणीदार म्‍हणुन नुतणीकरण करता येईल. येईल. आजीवन वर्गणीदारांची संख्‍या ही व्‍यक्‍तीक वर्गणीदार म्‍हणुन ५० व्‍यक्‍तींकरीता व आजीवन  वर्गणीदार कुटुंब २५ कुटुंबाकरीता ही संख्‍या मर्यादित राहील. प्रथम येणा-यास प्राधान्‍य या आधारावर आजीवन वर्गणीदार होता येईल. कालांतराने आजीवन वर्गणीदारांच्‍या संख्‍येत मागणी नुसार आणि जिल्‍हा क्रीडा संकुल समितीच्‍या निर्णयानुसार बदल करण्‍यात येतील.  (हा नियम भविष्‍यामध्‍ये आवश्‍यकतेनुसार उपयोगात आणला जाईल.)
  
सामान्य वर्गणीदार –
       आजीवन वर्गणीदार वगळता इतर सर्व वर्गणीदार हे                   सामान्य वर्गणीदार म्हणुन समजले जातील.
४.     सुट ( मासिक आणि वार्षिक वर्गणीची रक्‍कम भरण्‍यास सुट )
        मा.राज्‍यपाल, मा.मुख्‍यमंत्री,मा. उपमुख्‍यमंत्री , सर्व मा. राज्‍य मंत्रिमंडळ सदस्‍य, सर्व मा. राज्‍य मंत्री, आणि मुख्‍य सचिव, महाराष्‍ट्र शासनाच्‍या सर्व विभागांचे सचिव, सर्व विभागांचे विभागीय आयुक्‍त आणि क्रीडा विभागाचे अधिकारी, विभागातीलसर्व जिल्‍हयांचे जिल्‍हाधिकारी, क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी हे सर्व सन्‍माननीय सदस्‍य राहतील व त्‍यांना कोणत्‍याही प्रकारचे शुल्‍क भरण्‍याची आवश्‍यकता राहणार नाही.
    सन्‍माननीय सदस्‍य आणि आजीवन वर्गणीदार, जिल्‍हा क्रीडा संकुल समितीचे सदस्‍य यांना मासिक किंवा वार्षिक वर्गणी न भरण्‍याची सुट देण्‍यात येईल.
५.     व्‍यस्‍थापकीय समितीचे विशेष गुणवत्‍ता धारक व्‍यक्‍तींना सन्‍माननीय सदस्‍य म्‍हणुन प्रवेश देण्‍याचे अधिकार.
        क्रीडा क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात विशेष गुणवत्‍ताधारक अशा कोणत्‍याही व्‍यक्‍तीला जिल्‍हा क्रीडा संकुलाचे सन्‍माननीय सदस्‍य म्‍हणुन प्रवेश देण्‍याचे अधिकार जिल्‍हा क्रीडा संकुल समितीला राहतील.
६.     वर्गणीदारांचे न्‍याय्य व कादेशीर हक्‍क
        सर्व वर्गणीदारांना त्‍यांनी अदा केलेल्‍या वर्गणीच्‍या प्रकारानुसार जिल्‍हा क्रीडा संकुलातील सुविधांच्‍या सुधारणेकरीता आणि कार्यसंचालनाकरीता सुचना किंवा शिफारस करण्‍याची मुभा राहील. त्‍यांच्‍या सुचना जर क्रीडा संकुलाच्‍या उन्‍नतीकरीता पुरक ठरण्‍याच्‍या पात्रतेच्‍या असतील तर जिल्‍हा क्रीडा संकुल समितीव्‍दारे निश्चितच त्‍या सुचना विचारात घेतल्‍या जातील.
७.     वर्गणीदार होण्‍याकरीता अर्ज
                   
जी व्‍यक्ति जिल्‍हा क्रीडा संकुलाचा लाभ घेण्‍याकरीता सदस्‍य होऊ इच्छिते अशा व्‍यक्तिने विहित नमुन्‍यात जिल्‍हा क्रीडा संकुल समितीकडे अर्ज सादर करणे आवश्‍यक राहील. विहित नमुन्‍यातील अर्ज व जिल्‍हा क्रीडा संकुल समितीने ठरवून दिलेले शुल्‍क आणि आवश्‍यक असल्‍यास योग्‍य ती प्रवेश फी यांसह सादर करणे आवश्‍यक आहे. अर्जाचा स्‍वीकार करणे त्‍यांची छाननी करणे आणि सर्व प्रक्रीया पूर्ण करुन त्‍यास प्राथमिक मान्‍यता देण्‍याकरीता एक उपसमिती तयार करण्‍यात येईल. व आलेल्‍या अर्जांना जिल्‍हा क्रीडा संकुल समिती अंतिम मान्‍यता देईल.
       ब
उपसमिती मार्फत वर्गणीदार होण्‍याकरीता आलेल्‍या विनंती अर्जाचा स्‍वीकार  केला जाईल. त्‍यानंतर या विनंती अर्जांची पोलिस विभागामार्फत पडताळणी करण्‍यात येईल. त्‍यानंतर सदर अर्ज फेटाळला जाऊ शकतो तसे झाल्‍यास उपसमितीमार्फत तो अर्ज जिल्‍हा क्रीडा संकुल समिती समोर सादर करण्‍यात येईल. त्‍यानंतर कोणतेही कारण    देता सदर अर्ज फेटाळण्‍याचा अधिकार  जिल्‍हा क्रीडा संकुल समितीला राहील. अर्ज फेटाळण्‍यात आल्‍यास अर्जासोबत अर्जदाराने सादर  केलेली रक्‍कम त्‍यास परत  करण्‍यात येईल. जिल्‍हा क्रीडा संकुल समितीचा अर्ज  नाकारणे व स्‍वीकारण्‍याबाबतचा निर्णय अर्जदारास कळविला  जाईल.
८.     वर्गणी किंवा शुल्‍क भरण्‍याची पध्‍दत
नियमामध्‍ये दिल्‍यानुसार सर्व प्रकारची वर्गणी किंवा शुल्‍क हे धनादेश किंवा धनाकर्षाव्‍दारे महिन्‍याकरीता किंवा वर्षाकरीता आवश्‍यकतेनुसार आगाऊ भरण्‍यात यावे. धनादेश किंवा धनाकर्ष हे येणा-या पहिल्‍या महिन्‍याच्‍या किंवा वर्षाच्‍या (आवश्‍यकतेनुसार) देय राहतील आणि त्‍या महिन्‍याच्‍या किंवा वर्षाच्‍या १० तारखेच्‍या आत अदा करणे आवश्‍यक राहील. क्रीडा संकुलाच्‍या उत्‍पन्‍नाचा हिशोब ठेवण्‍याकरीता  वेगळी हिशोब वही करण्‍यात यावी आणि जर संकुलाच्‍या उत्‍पन्‍नावर सेवा कर देय असेल तर संकुलाच्‍या उत्‍पन्‍नातून हिशोब ठेवण्‍यात येणारी ही  वही आणि क्रीडा संकुलाचे बॅंकखाते यांचा  ताळमेळ ठेवण्‍यात यावा  आणि प्रत्‍येक महिन्‍याला जिल्‍हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी यांचेमार्फत तपासण्‍यात यावा. तसेच सनदी लेखापाल यांचे मार्फत लेखापरिक्षण करुन एप्रिल महिन्‍याच्‍या शेवटी क्रीडा संकुल समिती  समोर सादर करण्‍यात यावा.
९.     सदस्‍यांनीपाळावयाचेनियकमयाचेी10/2013 ¸üÖê•Öß ŸÖÆü× 
जिल्‍हा क्रीडा संकुलाचे वेळोवेळी निश्चित केलेले तसेच सुधारणा करुन लागू करण्‍यात आलेले नियम जाणून घेणे आणिी अशा सर्व अटींचे व नियमांचे पालन करणे सर्व सदस्‍यांना बंधनकारक राहील. वर्गणीदारांना देण्‍यात आलेले ओळखपत्र् किंवा प्रवेशपत्र दाखविल्‍यानंतर त्‍यांना जिल्‍हा क्रीडा संकुलामध्‍ये प्रवेश देण्‍यात येईल.
१०.वर्गणीदारास काढून टाकणे
अ)
जिल्‍हा क्रीडा संकुल समितीला मिळालेल्‍या माहितीनूसार काही कारणास्‍तव जिल्‍हा क्रीडा संकुल समितीचा जर असा निष्‍कर्ष निघत असेल की एखादा सदस्‍य हा संकुलामध्‍ये गैरवर्तणूक करत आहे किंवा त्‍यांनी संकुलास घातपाती ठरणारी अशी एखादी कृती केली आहे. तर त्‍या सदस्‍याला त्‍याने केलेल्‍या गैरवर्तणुकीबाबत किंवा संकुलास घातपाती ठरणा-या कृती बाबत स्‍पष्‍टीकरण मागण्‍याचा अधिकार जिल्‍हा क्रीडा संकुल समितीला आहे आणि सिंधुदुर्ग क्रीडा संकुलाच्‍या वर्गणीदारांमधून संबंधीत सदस्‍याला का कमी करण्‍यात येवू नये याबाबतकारणे द्यावीलागतील. अशा सदस्‍यांकडून आलेल्‍या स्‍पष्‍टीकरणाचा जिल्‍हा क्रीडा संकुल समितीकडून विचार करण्‍यात येईल. आणि त्‍यानूसार उपलब्‍ध पुराव्‍यानूसार पुढील चौकशी करण्‍यात येईल.
११.सदस्‍यत्‍व समाप्‍त होणे
जिल्‍हा क्रीडा संकुलाचे सदस्‍यत्‍व खालील  प्रकारे समाप्‍त होऊ शकते.
अ)
सदस्‍याने राजीनामा दिल्‍यास व त्‍यास जिल्‍हा क्रीडा संकुल समितीची मान्‍यता मिळाल्‍यास संबंधित सदस्‍याचे सदस्‍यत्‍व्‍ समाप्‍त होते.
ब)
शासकीय सेवेतून बडतर्फ केल्‍यास किंवा काढून टाकल्‍यास
क)
जो अपराध जिल्‍हा क्रीडा संकुल समितीच्‍या मते जर नैतिक अधःपतन करणारा आहे अशा अपराधाकरीता फौजदारी न्‍यायालयाकडून गुन्‍हेगार ठरविण्‍यात आले असल्‍यास
ड)
नादार म्‍हणुन ठरविला गेल्‍यास
इ)
देय असलेल्‍या तारखेपर्यंत वर्गणी, शुल्‍क किंवा इतर देय रक्‍कम अदा न केल्‍यास आणि थकबाकीदार/नियमोल्‍लंघी घोषित केल्‍या गेल्‍यास
१२.जिल्‍हा क्रीडा संकुल समिती रचना आणि कार्ये
महाराष्‍ट्र शासनाचा शासन निर्णय क्र.राक्रीधो-२००३/प्र.क्र.११क्रीयुसे-१, दि.२६/०३/२००३ आणि या शासन निर्णयाचे शुध्‍्दीपत्रक क्र.दिनांक २८/११/२००३ नुसार जिल्‍हा क्रीडा संकुल समितीची रचना करण्‍यात आलेली आहे. समितीची रचना पुढील प्रमाणे आहे ज्‍यामध्‍ये शासन निर्णयानुसार बदल होऊ शकतो.
   १ जिल्‍हाधिकारी               -  अध्‍यक्ष
   २ मुख्‍य कार्यकारी अधिकारी     -  सदस्‍य
   ३ पोलिस अधिक्षक            -  सदस्‍य
   ४ कार्यकारी अभियंता,          -  सदस्‍य
     सा.बां.वि. (ओरोस)
   ५ उपसंचालक, क्रीयुसे          -  सदस्‍य
   ६ शिक्षणाधिकारी, (प्रा./माध्‍य.)     सदस्‍य
   ७ जिल्‍हा माहिती अधिकारी     -  सदस्‍य
   ८ जिल्‍हा क्रीडा अधिकारी       -  सदस्‍य सचिव
   उपरोक्‍त उल्‍लेखित शासन निर्णयामध्‍ये सिंधुदुर्ग क्रीडा संकुल समितीची कार्ये नमूद केलेली आहेत.
शुल्‍क निर्धारण
अ.क्र.
प्रकार
गट
दर / मुदत
प्रतिव्‍यक्‍ती वर्गणी
कुटुंबातील चार सदस्‍यां करीता वर्गणी
मासिक
वार्षिक
मासिक
वार्षिक
लॉन टेनिस
१९ वर्ष पेक्षा कमी
रु.१०/तास
१००
१०००
६००
६०००
वयस्‍क
रु.५०/तास
३००
३०००
शा.क.वर्ग-४
१५०
१५००
बॅडमिंटन
१९ वर्ष पेक्षा कमी
१०/ तास
१००
१०००
६००
६०००
वयस्‍क
५०/तास
३००
३०००
शा.क.वर्ग-४
१५०
१५००
जलतरण तलाव
१९ वर्ष पेक्षा कमी
३०/तास
२००
२०००
१०००
१००००
वयस्‍क
५०/तास
४००
४०००
शा.क.वर्ग-४
२५०
२५००
टेबल टेनिस
१९ वर्ष पेक्षा कमी
१०/ तास
१००
१०००
६००
६०००
वयस्‍क
५०/तास
३००
३०००
शा.क.वर्ग-४
१५०
१५००
जिम
१९ वर्ष पेक्षा कमी
१०/ तास
१००
१०००
६००
६०००
वयस्‍क
१००/तास
३००
३०००
शा.क.वर्ग-४
१५०
१५००
४०० मी. धावन मार्ग असलेले खुले मैदान
सामान्‍य नागरीक
६०
६००
एकविध खेळ संघटना प्रतिव्‍यक्‍ती
१२०
१२००
इतर व्‍यावसायिक संस्‍था प्रति व्‍यक्तिी
१८०
१८००
तीन प्रकार (जलतरण व जिम वगळता)
१९ वर्ष पेक्षा कमी
२५/३ तास
२५०
२५००
१५००
१५०००
वयस्‍क
१००/३ तास
८००
८०००
स्‍वातंत्र्योत्‍सव स्‍मारक हॉल
रु. ५००/- प्रती तास दराने जास्‍तीत जास्‍त सकाळी ८ ते सायंकाळी ६ कालावधीच्‍या एका दिवसाकरीता रु.३०००/- भाडे + रु.५०००/- चे सिक्‍युरिटी डिपॉझिट जे सात दिवसात सर्व मालमत्‍तेची सुस्थितीबाबत पाहणी करुन परत देय राहील.
रु.१००/- प्रती तास वीज आकार शुल्‍क (एका दिवसाकरीता जास्‍तीत जास्‍त रु.५००/-)
बहुउद्देशिय हॉल
एक दिवसाचे भाडे रु.३०००/- व फ्ल्‍ाड लाईट वापरायचे शुल्‍क रु.५००/- प्रति दिन (एक दिवस सकाळी ८.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत)
१०
४०० मी. धावन मार्ग असलेले खुले मैदान
१)     खाजगी शैक्षणिक संस्‍थांच्‍या क्रीडा स्‍पर्धा आयोजनासाठी प्रतिदिन रु.५००/-
२)     एकविध खेळ संघटना यांच्‍या क्रीडा स्‍पर्धा आयोजनासाठी प्रतिदिन रु.७५०/-
३)     इतर व्‍यावसायिक संस्‍थांकडून प्रतिदिन रु.१०००/-
११
वसतीगृह सुविधा
प्रत्‍येक खेळाडूकडून प्रतिदिन रु.२०/- असा दर निश्चित करण्‍यात आला. (सभा दि.०८/११/१०१२) 
१२
दिनांक ०८/११/२०१२ सभा
अंध व अपंग व्‍यक्‍तींना अथवा या व्‍यक्‍तींकरीता कार्य करणा-या संस्‍थांना, सर्वसाधारण व्‍यक्‍ती/संस्‍थांकडून आकारल्‍या जाणा-या शुल्‍काच्‍या ५० टक्‍के शुल्‍क आकारण्‍यात यावे असे ठरले.
१३
वेळ
सर्व सोयीसाठी – सकाळी ६.०० ते सकाळी १०.००
-    सायंकाळी ४.०० ते सायंकाळी ८.००
जिमसाठी    - सकाळी ५.३० ते ९.३०
-    सायंकाळी ४.३० ते ८.३०
स्‍वीमींग     - देखभाल व चालविणेच्‍या कंत्राटदाराला नेमुन दिलेल्‍या वेळेनुसार
       वरील शुल्‍कामध्‍ये दरवर्षी एप्रिल महिन्‍यामध्‍ये बदल करण्‍यात येईल किंवा संकुलामध्‍ये अधिक सुविधांची वाढ करण्‍यात आल्‍यासही शुल्‍कामध्‍ये बदल होऊ शकतो.
सभासदांना सुचना –
१.     समितीने संकुल नोंदणी उपलब्‍ध वेळेनुसार वेळेचे बंधन पाळणे आवश्‍यक आहे.
२.     संकुलामध्‍ये विद्युत व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. वीज कपात असल्‍यास किंवा कुठल्‍याही तांत्रिक कारणांनी वीज उपलब्‍ध नसल्‍यास, त्‍या दिवशी सराव करणे शक्‍य नसल्‍यास शुल्‍क कपात किंवा परत मिळणार नाही.
३.     समिती मार्फत फक्‍त क्रीडांगणांच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. इतर सर्व प्रकारचे साहित्‍य सराव करणा-यांनी स्‍वतः आणावयाचे आहे.
४.     संकुलामध्‍ये खेळताना कोणत्‍याही प्रकारची इजा किंवा दुखापत झाल्‍यास सर्वस्‍वी जबाबदारी सराव करणा-याची राहील. संकुल समिती कोणत्‍याही प्रकारची भरपाई देणार नाही.
५.     बॅडमिंटन कोर्ट तसेच जलतरण तलाव या ठिकाणी आदळआपट करणे, पाणी सांडणे, थुंकणे, अनकुचीदार खिळे असलेले पादत्राणे किंवा चप्‍पल घालुन जाणे, चिखलाने माखलेले शुज घालुण जाण्‍यास बंदी आहे.
६.     विजेचा वापर जपून करावा. आवश्‍यकतेनुसार विजेचा वापर करण्‍यात यावा. मादक द्रव्‍य, गुटखा, तंबाखु, धुम्रपान करणे अथवा थुंकण्‍यास मनाई आहे. तसेच हॉलमध्‍ये कोणतेही खाद्यपदार्थ खाण्‍यास मनाई आहे.
७.     शासकीय स्‍पर्धा किंवा इतर कोणत्‍याही शासकीय समारंभास असल्‍यास संकुलाचा वापर बंद ठेवण्‍यात येईल. या बाबत संकुलामध्‍ये सुचना लावण्‍यात येईल.
८.     समितीला सार्वजनिक सुट्टी किंवा इतर दिवशी आवश्‍यक वाटल्‍यास संकुल बंद ठेवण्‍याचा अधिकार राहील.
९.     कोर्टवर येताना मौल्‍यवान वस्‍तू, मोबाईल आणू नये, गहाळ झाल्‍यास समिती जबाबदार राहणार नाही.
१०.संकुलामध्‍ये आपली वाहने शिस्‍तीने लावावित. वाहने आपल्‍या जबाबदारीवर आणावी.
११.संकुलातील हॉलमध्‍ये सराव सुरु असताना आपापसात बोलणे, ओरडणे, रॅकेट आपटणे, दुस-याच्‍या कोर्टात जाणून बुजुन शटल मारणे इत्‍यादी कोणत्‍याही प्रकारचे गैरवर्तन केल्‍यास सभासदत्‍व रद्द करण्‍यात येईल व भरलेले शुल्‍क परत करण्‍यात येणार नाहीत.
१२.वरील नियमांमध्‍ये बदल करण्‍याचा अधिकार समितीने राखुन ठेवलेला आहे.
महत्‍त्‍वाची सुचना –
               जिल्‍हा क्रीडा संकुल समितीने जेव्‍हा गरज पडेल तेव्‍हा वापरावयाचे नियम बदलण्‍याचा अधिकार राखून ठेवला आहे. व समितीने घेतलेला निर्णय सर्व वर्गणीदारांवर बदलाच्‍या तारखेपासून बंधनकारक असेल. समितीच्‍या निर्णयावरील अपील जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे करावे व जिल्‍हाधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतीम राहील.
जिल्‍हा क्रीडा अधिकारी तथा सचिव                                     जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष
जिल्‍हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्ग                              जिल्‍हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्ग

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...