०८ नोव्हेंबर २०१७

सन २०१४-१५, सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या वर्षाचे शिवछत्रपती राज्‍य क्रीडा जीवन गौरव पुरस्‍कारासाठी जाहीर आवाहन

            राज्‍यातील जेष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा क्षेत्रासाठी आपले सर्वस्व पणाला लावुन आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे, अशा जेष्ठ क्रीडा महर्षीचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो.
            जिल्‍ह्यातील वय वर्षे 60 किंवा त्यापेक्षा आधिक वय असलेले जेष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, संघटक- कार्यकर्ते क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा क्षेत्रासाठी आपले सर्वस्व पणाला लावुन आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे अशा नामवंत व्यक्तींची माहिती संबंधितांकडुन अर्ज मागविता त्यांचे संपुर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, व्यवसाय, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी त्या संबंधित कागदपत्रे वर्षनिहाय, केलेल्या कामाचा तपशिल . बाबतीची माहिती त्यांचेकडून संकलित करावयाची आहे.  त्‍यासाठी संबंधित जेष्‍ठ खेळाडू किंवा संबंधित खेळ संघटना यांनी या कार्यालयास प्रत्‍यक्ष अ‍थवा फोन/ ईमेलव्‍दारे संपर्क साधावा.  तसेच राष्ट्रीय क्रीडा महासंघाला संलग्न राज्य संघटना, इतर क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्ती यांनी आपली पुर्ण माहितीसह नावे जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावी असे आवाहन करण्‍यात येत आहे. अधिक माहीतीसाठी dsosindurg.dsys-mh@gov.in किंवा ०२३६२-२२८२७० क्रमांकावर संपर्क साधावा .

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...