योजना व अनुदान


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य
                   महाराष्‍ट्र शासनाच्‍या क्रीडा  व युवक सेवा संचालनालया अंतर्गत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे जिल्‍ह्यातील नोंदणीकृत व शिक्षण विभागाने मान्‍यता दिलेल्‍या माध्‍यमिक शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालये, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमार्फत चा‍लविण्‍यात येणा-या प्राथमिक / माध्‍यमिक शाळा अथवा कनिष्‍ठ महाविद्यालये, आदिवासी विभागामार्फत चालविण्‍यात येणा-या आश्रमशाळा, विविध खेळांच्‍या विकासासाठी कार्यरत असणा-या तसेच सार्वजनिक विश्‍वस्‍त अधिनियम १९५० किंवा संस्‍था नोंदणी अधिनियम १८६० अन्‍वये पंजीबध्‍द असतील अशा क्रीडा संस्‍था, युवक मंडळे इत्‍यादींना जिल्‍हा वार्षिक योजना अंतर्गत पुढील योजनांच्‍या माध्‍यमातून शासकीय अनुदान जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत देण्‍यात येते.
व्‍यायामशाळा विकास अनुदान
           तरुण पिढीमध्‍ये व्‍यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी करण्‍यासाठी या योजने अंतर्गत पात्र संस्‍थांना व्‍यायामशाळांच्‍या  बांधकामासाठी अनुदान देण्‍यात येते. ज्‍यामध्‍ये व्‍यायामगृह, स्‍वच्‍छतागृह, भांडारगृह, कार्यालय इत्‍यादी सुविधांची उभारणी करण्‍यात येते.  व्‍यायामशाळा बांधकाम या बाबीसाठी जास्‍तीत जास्‍त रु.०७.००लक्ष इतके अनुदान देण्‍यात येते. नोंदणीकृत व पात्र व्‍यायामसंस्‍थांना नविन व आधुनिक व्‍यायाम साहीत्‍य खरेदी करण्‍यासाठीही या योजनेअंतर्गत अनुदान देण्‍यात येते. व्‍यायाम साहीत्‍य खरेदीसाठी पात्र संस्‍थांना जास्‍तीत जास्‍त रु.०७.००लक्ष इतके अनुदान देण्‍यात येते. 
                      व्‍यायामशाळा विकास अनुदानाकरीता अर्जासाठी येथे क्‍लीक करावे 
क्रीडांगण विकास अनुदान
          राज्‍यातील उद्योन्‍मुख खेळाडूंना त्‍यांचे क्रीडा कैाशल्‍य वाढविण्‍यासाठी व क्रीडांगण विकसीत करण्‍याची संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी सुयोग्‍य क्रीडांगणाच्‍या मूलभूत सुविधा मोठ्याप्रमाणात निर्माण व्‍हाव्‍यात  या योजनेचा उद्देश आहे. या योजने अंतर्गत पात्र संस्‍थांना क्रीडांगणे विकसीत करण्‍यासाठी विविध बाबींकरीता अनुदान देण्‍यात येते. ज्‍यामध्‍ये २०० मी अथवा ४०० मीटरचा धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास कुंपण घालणे, विविध खेळांची प्रमाणित मैदाने तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे, पाण्‍याची सुविधा निर्माण करणे व भांडारगृह बांधणे, क्रीडांगणांवर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहीत्‍य खरेदी करणे, क्रीडांगणावर मा‍तीचा / सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्‍यवस्‍था तयार करणे,  प्रेक्षक गॅलरी/आसन व्‍यवस्‍थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्‍यवस्‍था करणे, निर्मीत सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्‍यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे बसविणेव मैदानावर रोलींग करण्‍यासाठी मिनी रोलर खरेदी करणे, या बाबींचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत एका बाबीसाठी पात्र संस्‍थांना जास्‍तीत जास्‍त रु.०७.००लक्ष इतके अनुदान देण्‍यात येते. 
                        क्रीडांगण विकास अनुदानाकरीता अर्ज 
                       प्रथम हप्ता  अर्जाकरीता येथे क्लिक करावे
                        व्दितीय  हप्ता  अर्जाकरीता येथे क्लिक करावे

        या योजनांतर्गत अनुदान मिळण्‍याकरीता इच्‍छुक संस्‍थांनी संपुर्ण माहिती भरलेल्‍या विहीत नमुन्‍यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्‍ताव जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावे. पात्र संस्‍थांना या योजनांतून अनुदान देण्‍यात येईल. विहीत नमुन्‍यातील अर्ज व अधिक माहिती करीता जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे
जिल्‍हा क्रीडा अधिकारी
सिंधुदुर्ग

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...